Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल ग्रामीण रुग्णालयात दीड वर्षांपासून एक्स-रे मशीन बंद; रुग्णांची गैरसोय, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 2, 2026
in आरोग्य
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

यावल ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून एक्स-रे मशीन बंद अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे रुग्णांना अत्यावश्यक असलेली एक्स-रे सेवा मिळत नसून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन दीड वर्षांपासून बंद असतानाही क्ष-किरण वैद्यकीय अधिकाऱ्याला दरमहा नियमित वेतन दिले जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रुग्णालयात एक्स-रे सुविधा बंद असल्याने अपघातग्रस्त, हाडांचे फ्रॅक्चर, छातीचे आजार तसेच इतर तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन एक्स-रे काढावे लागत असून त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

यावल ग्रामीण रुग्णालयात एक्स-रे मशीन बंद असल्याने मशीन हाताळणारे क्ष-किरण वैद्यकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत नियमित उपस्थित राहतात की नाही, याबाबतही रुग्णांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याला येथे पात्र असे कामकाज उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या नियुक्तीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्रकाराकडे राजकीय व सामाजिक पदाधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता प्रवीण डांबरे यांनी केला आहे. त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन तात्काळ दुरुस्त करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ज्या ठिकाणी एक्स-रे मशीन कार्यरत आहे त्या ठिकाणी संबंधित क्ष-किरण वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्यास रुग्णांना लाभ मिळू शकतो, अशी चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे.

यावल ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एक्स-रे मशीन तातडीने दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

आपुलकी” प्रकल्पातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना नवी आशा; 10 मेपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

Next Post

चौथा स्तंभ की दबावाखालील आवाज?  पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी

Next Post

चौथा स्तंभ की दबावाखालील आवाज?  पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर येथील तरुणी मेमू रेल्वेने प्रवास करताना बेपत्ता; शोध घेण्याचे आवाहन

May 3, 2026

उन्हाची तीव्रता…अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

May 3, 2026

जळगावातील ऑर्किड हॉस्पिटलचा मनमानी कारभार; लिफ्ट बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल!

May 3, 2026

घार्गे यांच्या बदलीमागे कथीत कॉल सेंटर!; नवे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यासमोर खाकीतील बदमाश टोळ्यांचेच मोठे आव्हान

May 3, 2026

बोरखेडा खुर्द ज्ञानदीप विद्यालयाचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९८.१३ टक्के

May 2, 2026

चौथा स्तंभ की दबावाखालील आवाज?  पत्रकारितेचे स्वातंत्र्य आणि जबाबदारी

May 2, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..