
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
बोरखेडा खुर्द येथील ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी विज्ञान शाखेचा निकाल यंदा ९८.१३ टक्के लागला असून शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक रुचिता पंकज नेहेते हिने ७७.६७ टक्के, द्वितीय क्रमांक कुंजल इंगळे हिने ७६.१७ टक्के, तर तृतीय क्रमांक गायत्री बाविस्कर हिने ७५.८३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
या निकालाबद्दल सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब धर्मराज पवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. आर. नप्ते, शिक्षक श्री. आर. जी. तडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







