
अमळनेर: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील जानवे येथील रत्ना विजय कटरे ही तरुणी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी विखरण स्थानकावरून मेमू रेल्वेने अमळनेरकडे जाण्यासाठी निघालेली रत्ना अद्याप घरी पोहोचलेली नसल्याने कुटुंबियांनी चिंतेत असून तिचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्ना काल सायंकाळी ६:०० वाजता विखरण रेल्वे स्थानकावरून अमळनेरला जाण्यासाठी मेमू रेल्वेने प्रवास करत होती. ती अमळनेर स्थानकावर उतरणे अपेक्षित होते, मात्र बराच वेळ होऊनही ती घरी पोहोचली नाही. तिचा मोबाईल देखील सध्या बंद येत आहे.
वर्णन:
- नाव: रत्ना विजय कटरे
- राहणार: जानवे, ता. अमळनेर, जि. जळगाव
विखरण ते अमळनेर रेल्वे मार्ग, अमळनेर रेल्वे स्टेशन किंवा बस स्थानक परिसरात या तरुणीबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास किंवा ती दिसल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक:
- शंकर पगारे: ७४२००८६६७५
- मोबाईल: ९०२१०१४३४२
कृपया ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी, जेणेकरून रत्नाचा शोध लागण्यास मदत होईल.






