
*शिंदखेडा, ता. शिंदखेडा :* तालुक्यातील *रामनगर रहिमपुरे* गावचे तरुण *योगेश रावसाहेब पाटील* हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असताना *एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण* होऊन *उप पोलीस निरीक्षक (PSI)* पदी नियुक्त झाले आहेत.
*”गरीब शेतकऱ्याचा मुलगा झाला उपनिरीक्षक”* या अभिमानास्पद घटनेने संपूर्ण रामनगर रहिमपुरे गावात जल्लोषाचे वातावरण आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून, शेतात राबणाऱ्या वडिलांचे कष्ट पाहत मोठे झालेले योगेश यांनी जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी एमपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला व आज PSI पदाला गवसणी घातली.
त्यांच्या या यशाबद्दल *संघर्ष ग्रुप, रहिमपुरे-रामनगर* व समस्त ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला. गावातील तरुणांसाठी योगेश पाटील हे *प्रेरणास्थान* ठरले आहेत.
*उप पोलीस निरीक्षक योगेश रावसाहेब पाटील यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा
संघर्ष ग्रुप, रहिमपुरे-रामनगर
गावचा अभिमान!
रामनगर रहिमपुरेचे योगेश रावसाहेब पाटील महाराष्ट्र पोलीस दलातून थेट PSI झाले!
गरीब शेतकऱ्याचा मुलगा, जिद्दीच्या जोरावर बनला अधिकारी.
संघर्ष ग्रुप व गावात जल्लोष! संपूर्ण ग्रामस्थ माता भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते







