Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 21 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 1, 2026
in शासकीय
0

विशेष बातमी प्रशांत बाफना
महाराष्ट्र व कामगारदिनाच्या पूर्व संध्येला राज्य सरकाने तब्बल 21 आयपीएस अधिकार्‍यांच्य बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे 1 मे महाराष्ट्र आणि कामगार दिन हा राज्यासाठी महत्वाचा दिवस आहे. राज्य सरकारकडून सातत्याने आयएएस आणि आयपीएस स्तरावरच्या अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जात आहेत. यसा आधीदेखील राज्याच्या गृह खात्याने अनेक आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. तसेच प्रशासनातील अनेक आयएएस अधिाकर्‍यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बदल्यामध्ये मुंबईपासून ते ठाणे धुळे, अमरावती, नाशिक, चंद्रपूर, आहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी अशा विविध जिल्ह्यांतील प्रमुख पोलिस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

राज्य सरकारच्या बदली प्रक्रियेनुसार जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय के. बन्सल यांची पोलीस अधीक्षक, सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची पोलीस महासंचालक कार्यालय सहायक पोलिस महानिरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह एस. परदेशी यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाचे उपायुक्त संदीप घुगे यांची मुंबई शहरच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) आणि सहायक पोलीस महानिरिक्षक अस्थापना यांचे स्टाफ ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची आहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक धोंडोपंत एस. स्वामी यांची नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वाशिमचे पोलीस अधीक्षक अनुज मिलिंद तारे यांची पुणे येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची मुंबई शहर पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांची नंदुरबार पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाचे अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधु यांची जालनाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे

Previous Post

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; चर्मकार समाज बांधवांचे निवेदन

Next Post

मोबाईलवरच जनगणना; यावल तालुक्यात स्वगणना अभियानाला वेग

Next Post

मोबाईलवरच जनगणना; यावल तालुक्यात स्वगणना अभियानाला वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा; नियमांना हरताळ, कारवाईची मागणी जोरात!

May 1, 2026

मोबाईलवरच जनगणना; यावल तालुक्यात स्वगणना अभियानाला वेग

May 1, 2026

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 21 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

May 1, 2026

आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुकेश गुंजाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी; चर्मकार समाज बांधवांचे निवेदन

May 1, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर जाधव

May 1, 2026

अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी लाच घेताना दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात एक ताब्यात तर दुसरा फरार

April 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..