
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका – प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी तालुक्यातील असणाऱ्या अति दुर्गम डोंगराळ भागातील गणेगाव येथील भूमिपुत्र व राहुरी फॅक्टरी येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक श्री .बाळासाहेब कोबरणेयांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह नुकतेच जाहीर झाले आहे .
त्यांनी केलेल्या पंधरा वर्षाच्या सेवेच्या प्रामाणिक निष्ठावंत सेवेबद्दल आणि उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस खात्यातील हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदानकरण्यात येणार आहे .
गणेगाव ते राहुरी फॅक्टरी चार ते पाच किलोमीटर दररोजचशिक्षण प्रवास त्यांनी सायकलवर पूर्ण केला ऊन वारा पाऊस कुठल्याही अडथळ्या त्यांच्या जिद्दीला कधीही रोखू शकले नाही शेतकरी कुटुंबात वाढताना वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवत त्यांनी स्वतःच्या मेहतिनेयशाची उंची गाठली संकटांना जुमानता सकारात्मकतेने पुढे जाण्याचा त्यांचा प्रवास प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी आहे .
सन 2021 मध्ये एम पी एस सी मार्फत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन नाशिक येथे त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले सोलापूर ठाणे येथे प्रामाणिक सेवा बजावत सध्या ते ठाणे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे आजही आपल्या मातीशी नातं जपत जुन्या मित्रांशी संवाद ठेवत आणि तरुणांना मार्गदर्शन करते समाजात सकारत्मक ऊर्जा निर्माण करत आहे .
त्यांच्या या यशाबद्दल राहुरी तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .







