Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी ‘या ‘४ ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..!:-

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 11, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
शहरात अवैध रित्या सुरू असलेल्या जुगार आणि बिंगो अड्ड्यांवर पोलिसांनी रविवारी सायंकाळी मोठी कारवाई केली.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार, एकाच वेळी शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी तब्बल ६ लाख ३५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या धडक कारवाईमुळे जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.१० मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिर (प्रभारी अधिकारी, कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार) यांना शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथके तयार करून एकाच वेळी चार ठिकाणी धाडी टाकल्या.

१)गांधीनगर (बोल्हेगाव) ५,३०० रोख,आयवा कंपनीचा टीव्ही, एक्सट्रीम वायफाय,फोन-पे मशीन, बॅनर आणि मोबाईल. १,२१,२००/-

२)दूध डेअरी चौक,शेंडी बायपास (हॉटेल मातोश्री शेजारी) ९ आरोपींना अटक, ४०,६०० रोख,लॅपटॉप,टीव्ही स्क्रीन,कीबोर्ड,फोन-पे मशीन आणि मोबाईल.२,३६,६००/-

३)शेंडी बायपास (हॉटेल भाग्यश्री शेजारी) ५ आरोपींना अटक,२१,००० रोख, डेल सीपीयू, जिओ मॉनिटर, ०२ आयफोन, लॅपटॉप आणि मोबाईल. १,४९,७००/-

४) नवनागापूर (दूध डेअरी चौक) ४ आरोपींना अटक, ३,८५० रोख, ३ सीपीयू, ६ मॉनिटर, ३ प्रिंटर, ३ स्कॅनर आणि जुगाराचे साहित्य. १,२८,३५०/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर संबंधित आरोपीं विरुद्ध एम.आय.डी.सी.आणि तोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) नुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे स.पो.नि.जगदीश मुलगिर,पो.उपनि.गजेंद्र इंगळे,पो.उपनि.योगेश पवार,ग्रेड पो.उपनि.निसार शेख,पोलीस अंमलदार रवींद्र टकले,दिपक शिंदे,नंदकुमार पठारे,प्रमोद लहारे,इस्माईल पठाण,रामनाथ डोळे,कैलास शिरसाठ आणि पोपट देव्हारे यांनी केली आहे

Previous Post

खासदार लंके पुन्हा वादात! खरातनंतर आणखी एक भोंदूबाबाला शाल, पायावर डोकं, वास्तव पहा…

Next Post

सागर पार्कवर क्रिकेट बंदीचा घाट खेळाडूंवर अन्याय; महासभेत ठराव फेटाळण्याची माजी नगरसेवकांची मागणी

Next Post

सागर पार्कवर क्रिकेट बंदीचा घाट खेळाडूंवर अन्याय; महासभेत ठराव फेटाळण्याची माजी नगरसेवकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल येथे “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर” उत्साहात संपन्नशेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

May 12, 2026

रावेर तालुक्यात सुकी नदीपात्राची खुलेआम लूट; वाळू-माती माफियांचा धुमाकूळ, तहसीलदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

May 12, 2026

यावल तालुक्यात अवैध पन्नी दारूचा सुळसुळाट ; उत्पादन शुल्क विभाग मात्र ‘हप्ते वसुलीत’ व्यस्त ?तरुणाई व्यसनाधीन, संसार उद्ध्वस्त… महिलांचा संताप अनावर

May 12, 2026

महावितरण’चा अंधेर नगरी चौपट राजा कारभार; अजिंठा हौसिंग सोसायटीत १० तासांपासून अंधार, जनतेचा संताप अनावर!

May 12, 2026

सागर पार्कवर क्रिकेट बंदीचा घाट खेळाडूंवर अन्याय; महासभेत ठराव फेटाळण्याची माजी नगरसेवकांची मागणी

May 11, 2026

अहिल्यानगर पोलिसांचा जुगार अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक.. एकाच वेळी ‘या ‘४ ठिकाणी छापे..६.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त..!:-

May 11, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..