Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भाऊसाहेब पगारे स्वगृही परतल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 26, 2026
in राजकीय
0

हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
गेल्या काही दिवसापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट )ला सोडचिट्टी देऊन महाराष्ट्र राज्याचे उप .मुख्यमंत्री ना .एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या शिवसेना (शिंदे गटात )मध्ये प्रवेश करणारे श्री .भाऊसाहेब पगारे हे पुन्हा स्वगृही म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटात )परतले असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील आर पी आय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री .भाऊसाहेब पगारे यांचा स्वगृहीपक्षप्रवेश नुकताच पार पडला यावेळी पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्रीकांत जी भालेराव अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आदींसह जिल्ह्यामधील पक्षाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
श्री .भाऊसाहेब पगारे यांचा राजकीय प्रवास हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच पक्षातून सुरू झाला आहे ते नेहमीच पक्षाचे अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब यांचे अहिल्यानगर जिल्ह्यामधील विश्वासू एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते व आजही ओळखले जातात श्री .पगारेहे कित्येक वर्ष ना.आठवले साहेब च्या आदेशाने व साहेबांचे एकनिष्ठ व विश्वासू असल्याने त्यांनी राहुरी तालुका आर पी आय च्या अध्यक्षपदावर कित्येक वर्ष काम केले आहे .तालुकाध्यक्ष पदावर काम करत असताना देवळालीप्रवरा नगरपालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजले होते ना .आठवले साहेबांच्या कानावर ही निवडणुकीची माहिती जाताच आठवले साहेबांनीत्यावेळेसचे राहुरी तालुक्याचे आमदार असलेले श्री .प्रसाद रावजी तनपुरे साहेबांना फोन करून माझ्या पक्षाचा एकनिष्ठ असणाऱ्या व आपल्या राहुरी तालुक्यात तालुकाध्यक्ष पदावर काम करणारा श्री .भाऊसाहेब पगारे यांना आपण उमेदवारी द्यावी व निवडून आणण्याची आपण जबाबदारी घ्यावी अशी विनंती ना .आठवले साहेबांनी श्री .तनपुरे साहेबांना केली होती सदर निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे स्वप्नातही भाऊसाहेबपगारे यांच्या नव्हते तसे पाहिल्यास पगारे हे खरे तर मा .खा .प्रसाद राव तनपुरे साहेबांचे कट्टर समर्थक मानले जातात त्यामुळे तनपुरे साहेबांनी ना .आठवले साहेबांना लगेच होकार दिला श्री .तनपुरे साहेबांनी दिलेला शब्द पाळून पगारे यांना देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणूक मध्ये प्रचंड बहुमताने निवडून आणलेच तर आणलेच पालिकेच्या उपनगराध्यक्षपदीही विराजमान हे केले .पगारे यांनी नगरसेवक उपनगराध्यक्ष वापर गोरगरीब जनतेसाठी करून राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसराचा तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण यांच्या सहकार्याने विकास कामे केली .
कालांतराने राजकारणात रुसवे फुगवे होतच असतातत्यामुळे पगारे हे आरपीआय पक्षातून बाजूला गेले समाजसेवेची आवड असल्याने समाजकार्य करण्यासाठी राजकारण करावेच लागते म्हणून पगारे यांनी महाराष्ट्र राज्याचे उप .मुख्यमंत्री ना .एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या शिवसेना (शिंदे गटात )प्रवेश केला पगारे यांनी शिंदे गटात प्रवेश करतात शिंदे साहेबांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या अनुचित जाती जमातीच्या विभागाच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची धुरा दिली पगारे यांच्या अंगात खरंतर डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे रक्त असल्याने कोणाच्या ताटाखालचं मांजर होऊन किंवा कुणाच्या चौकटीमध्ये राहून काम करण्याची सवय नसल्याने त्यांनी पुन्हा परत आपल्या दीनदलित गोरगरिबांच्या प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्या रक्ताच्या लक्षात म्हणजेच आरपीआय मध्ये परत येण्याचा निर्णय घेतला पगारे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजन ब्राह्मणे व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी करून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ना .आठवले साहेबांच्या आदेशाचे पालन करून आरपीआय मध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले .
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदासजी आठवले साहेब व पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाऊसाहेब पगारे व राजन ब्राह्मणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आरपीआय पक्षामध्ये प्रवेश केला त्यांच्या या झालेल्या पक्ष प्रवेशामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीचे चित्र वेगळे दिसणार आहे ना .रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करणारे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पगारे व ब्राह्मणे यांनी पक्ष प्रवेश केल्याचे सांगितले या प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणाला नवे वळण मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे भाऊसाहेब पगारे यांच्या समवेत राजन ब्राह्मणे संतोष ब्राह्मणे आकाश गोंडगे निसर भाई पठाण विजयराव जाधव महेश सुरडकर आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला .
पक्षप्रवेश अहिल्यानगरचे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला
जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ किशोर पंडित सागर संसारे सुरेश जगताप नाना गायकवाड पप्पू कोळगे जॉन रणनवरे आबा रणनवरे सुनील जाधव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Previous Post

आमोदा प्रकरणात पक्षपाती कारवाईचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाऊसाहेब पगारे स्वगृही परतल्याने जिल्ह्यातील आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

April 26, 2026

आमोदा प्रकरणात पक्षपाती कारवाईचा आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

April 26, 2026

खोटी हजेरी!’ मोहमांडलीत सरकारी तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा; प्रशासनाच्या दिरंगाईविरुद्ध तायडेंचे आता ‘आमरण उपोषणाचे’ अस्त्र!

April 26, 2026

सिताराम रंगनाथ घाडगे यांचे निधन

April 24, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे किनगाव आरोग्य सेवेचा बोजवारानवीन इमारत तयार, तरीही रुग्णांना ‘पी.एम. रूम’मध्येच उपचार

April 24, 2026

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

April 23, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..