Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 23, 2026
in क्राईम
0


‘दैवी शक्ती’ च्या नावाखाली महिलेला थेट लॉजवर नेलं; आधी कुंडात अंघोळ नंतर अत्याचार, धरणगावच्या महेशगिरी च्या विरोधात लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल



नाशिक/प्रशांत बाफना: मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भोंदूगिरीच्या घटना उजेडात येत आहेत. नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे तर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव येथील एका भोंदू बाबाने कौटुंबीक समस्या दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेचे लैंगिक शोषण केलेल्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदूवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुटुंब मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे टेन्शनमध्ये होते. त्यामुळे हे घरगुती तणावावर तोडगा काढण्यासाठी या महिलेचे कुटुंबीय धरणगाव येथील महेशगिरी याच्या मठात गेले होते. यावेळी भोंदू बाबाने महिलेला बाहेरची बाधा असल्याचं सांगून भीती घातली आणि दैवी विधीच्या नावाखाली तिला एका कुंडात अंघोळ करायला लावून ओल्या वस्त्रनिशी उंबराच्या झाडाला फेर्‍या मारायला लावल्या. त्यानंतर काही दिवसांनी भोंदूने या महिलेला व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लिल मेसेज पाठवायला सुरुवात केली.


एकदा त्याने असाच मेसेज पाठवत दैवी विधीसाठी एकांतात यावे लागेल, असं सांगून तिला नाशिकमध्ये बोलावलं. त्यानंतर तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.


यावेळी, “ माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असून माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही” अशी धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला आणि तिचे अक्षेपार्ह फोटोही काढल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या (अंनिस) पदाधिकार्‍यांशी संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


मात्र, अशा भोंदूबाबांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिवाय महिलांनी देखील असं भोंदूच्या जाळ्यात अडकू नये यासाठी महिलांमध्ये जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे

Previous Post

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पुन्हा हादरला ; नाशिकमध्ये पुन्हा एका भोंदूबाबाचा कांड समोर

April 23, 2026

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात चाकणकर नंतर दुसरी मोठी विकेट

April 23, 2026

यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर यांची धडक आढावा बैठक; अधिकाऱ्यांना फटकार, किनगाव आरोग्य केंद्र हलविण्याचे आश्वासन

April 23, 2026

स्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या रावेर तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण यांची निवड

April 23, 2026

जळगावचा डंका आता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत! ‘दिल पे तेरा नाम’ मधून नमन-दिव्या ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला; २४ एप्रिलला होणार ग्रँड रिलीज

April 23, 2026

वाल्मिक कराड गँगचा तुरुंगात हैदोस; प्रतिक घुले, सुदर्शन घुले यांची कैद्याला जबर मारहाण

April 23, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..