Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावलमध्ये भगवान एकलव्य जयंती उत्साहात; पारंपरिक वाद्यांसह भव्य मिरवणूक, आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 16, 2026
in धार्मिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत मानले जाणारे भगवान एकलव्य यांची जयंती निमित्त शबरीमाता आदिवासी मित्र मंडळ, यावल यांच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रतिमापूजनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरात भक्तीमय वातावरणात पूजन, सत्कार आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व समाजबांधवांचा “फूल नाही तर फुलाची पाकळी” या भावनेतून स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास यावल शहरातील विद्यमान व माजी नगरसेवक, विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी तालुकाप्रमुख उपस्थित होते. आदिवासी भिल समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
पूजनानंतर शहरातून पारंपरिक ढोल-ताशे व आदिवासी वाद्यांच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान युवकांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे आदिवासी महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.
कार्यक्रमास डॉ. कुंदन फेगडे, हेमराज फेगडे, नंदा काकू महाजन, शुभांगी सविता, सविता नन्नवरे, योगेश चौधरी, रुबाबदादा तडवी, सागर चौधरी, सागर भाऊ कोळी, भरत भाऊ पाटील, विलास भाऊ भास्कर, मुकेश भाऊ कोळी, डॉ. विवेक अडकमोल, रवींद्र वाघ, रोशन येवले, विजय ननवरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
पंचक्रोशीतील आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्याने यंदाची एकलव्य जयंती यावलमध्ये विशेष उत्साहात आणि दिमाखात साजरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Previous Post

हिंगोणा गावातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत तक्रार; अभियंत्याच्या चौकशीची मागणी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची गरज

Next Post

जळगावात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ‘सकल ज्ञान महोत्सवा’त स्मिता जयकर यांचा गौरव

Next Post

जळगावात राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा ‘सकल ज्ञान महोत्सवा’त स्मिता जयकर यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..