Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

हिंगोणा गावातील निकृष्ट रस्त्यांच्या कामाबाबत तक्रार; अभियंत्याच्या चौकशीची मागणी आमदार अमोल जावळे यांनी लक्ष देण्याची गरज

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 16, 2026
in शासकीय
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील हिंगोणा येथे आमदार निधीतून करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावरून प्रश्न निर्माण झाला असून या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. रावेर-यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. हिंगोणा येथील हटकर कॉलनी तसेच गावांतर्गत डांबरीकरणाचे रस्ते हे त्याच विकासदृष्टीचा भाग म्हणून मंजूर करण्यात आले होते.
मात्र सदर रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हर्षल आंबेकर यांनी केला आहे. दिनांक 30 रोजी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, तसेच बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी आणि पंचायत समिती यावल येथील गटविकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून यावल तालुक्यात भरघोस विकासकामे होत असताना हिंगोणा येथे झालेल्या डांबरीकरणाच्या कामात दर्जाबाबत गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांना वेळोवेळी कामाबाबत माहिती देण्यात आली, तसेच निकृष्ट कामाचे फोटो व व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आले. तरीदेखील त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिलेली नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच पंधरा दिवस उलटूनही तक्रारीची दखल घेण्यात आलेली नसल्याने संबंधित अभियंता रवींद्र इंगळे यांची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची गुणवत्ता अबाधित राहावी व नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांत व्यक्त होत आहे.

Previous Post

दिव्यांग कल्याण प्रधान सचिव तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई सुरूच; संस्थांना आखून दिली लक्ष्मणरेषा , 28 फेब्रूवारीनंतर नॉनस्टॉप कारवाई ..

Next Post

यावलमध्ये भगवान एकलव्य जयंती उत्साहात; पारंपरिक वाद्यांसह भव्य मिरवणूक, आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग

Next Post

यावलमध्ये भगवान एकलव्य जयंती उत्साहात; पारंपरिक वाद्यांसह भव्य मिरवणूक, आदिवासी बांधवांचा मोठा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..