Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 8, 2026
in क्राईम
0

बीड/प्रशांत बाफना
मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घुण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे. यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मिक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठ, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण कोर्टाने त्याला जामीन नाकारला . बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असले तरी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, याम मागणीसाठी कराड, चाटे या दोन्ही आरोपींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

दरम्यान या दोघांनी बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यालयायात काय सुनावणी होते? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे.

या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांकडून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण, पुराव म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची ‘ क्लोन कॉपी’ देण्याची मागणीही याचवा समावेश होता, सरकारी पक्ष केवळ त्यांना फायद्याचा असेल तेवढाच डेटा दाखवत असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला होता.

न्यायालयाने स्वत: लॅपटॉप कोर्टात ओपन करून संपूर्ण डेटा तपासावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. तर आरोपी जयराम चाटे याने बीड न्यायालयात जामीनासाठी अर्जकेला असून, प्रतीक घुले याने जेलमधूनच आपला अर्ज सादर केला आहे. तर विष्णू चाटे याने जामीनसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

21 मे रोजी पुढील सुनावणी :

9 डिसेंबर 2014 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह आठ आरोपींना अटक केली, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे.

12 मार्च रोजी यसा प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे

Previous Post

पाथर्डीत भीषण अपघात : भरधाव स्विफ्ट कारची धडक, महिलेला गंभीर दुखापत; चालक फरार

Next Post

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

Next Post

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी

May 8, 2026

भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक

May 8, 2026

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

May 8, 2026

कारागृहातून कायमचं बाहेर पडण्यासाठी वाल्मिक कराड, विष्णू चाटेची धडपड; उच्च न्यायालयात दोषारोपपत्र रद्द करण्याच्या मागणीचा अर्ज

May 8, 2026

पाथर्डीत भीषण अपघात : भरधाव स्विफ्ट कारची धडक, महिलेला गंभीर दुखापत; चालक फरार

May 7, 2026

तरुणांनीदेशासाठीघडलेपाहिजे-ह.भ.प.योगीदत्तनाथमहाराजसाकळी येथील विराट हिंदू संमेलनाप्रसंगी मार्गदर्शनपर प्रतिपादन

May 7, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..