
उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
आज सर्वत्र हिंदू मेळाव्यांची गरज का आहे ?कारण हिंदू समाज जाती – पंथामध्ये विखुरला गेलेला त्यामुळे हा सर्व हिंदू समाज भारतभूमीसाठी एक संघ झाला पाहिजे हिंदूंच्या संघटनासाठी हिंदू मेळाव्यांची गरज आहे.अशा मेळावांमधून हिंदू समाज जागृत होत असून हिंदू समाज जागृत होणे ही काळाची गरज बनली आहे.जगात व देशातील विविध भागातून हिंदू संपत आहे हिंदू संपू नये म्हणून हिंदू मेळाव्याची गरज आहे असे गुरु गोरक्षनाथ आखाडा सिंधखेड्याचे गादीपती ह.भ.प.योगी दत्तनाथ गुरु महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात ठामपणे सांगितले.
साकळी ता.यावल येथील विराट हिंदू संमेलनाप्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त हिंदू समाजात एकता ,सामाजिक बंधूता दृढ व्हावी तसेच हिंदू समाजातील जात ,भाषा व पंथ यांचा भेदभाव विसरून हिंदू समाज एकत्रीकरणाच्या मुख्य उद्देशाने तसेच सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी सकल हिंदू समाज समिती साखळी मंडळाच्या वतीने दि.२ मे २०२६ रोजी साकळी येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन गावातील भवानी माता मंगल कार्यालयाच्या परिसरात करण्यात आलेले होते. या विराट अशा हिंदू संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुरु गोरक्षनाथ आखाडा शिंदखेड्याचे गादीपती ह.भ.प. श्री. योगी दत्तनाथ महाराज यासोबतच सुपरिचित असे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भुसावळ नगर कार्यवाह प्रसादजी पांडे हे मार्गदर्शन लाभले.
ह.भ.प.योगी दत्तनाथ महाराज पुढे म्हणाले की,जगाच्या पाठीवर अनेक देश इतर धर्माच्या अधिपत्याखाली येत आहे.ही फार मोठी चिंतेची बाब आहे.त्याप्रमाणेच आमची हिंदू जिवनशैली इतर संस्कृती प्रमाणे जगत आहे.हिंदू कुटुंब संपवण्यासाठी पाश्चिमात्यांनी मोठे काम केले आहे व करत आहे. ही बाब चिंताजनक असून हिंदूंना गीता माहीत नसेल तर हिंदू कसा टिकेल ? असा प्रश्न उपस्थित केला.
आपल्या आसपासच्या अनेक हिंदू महिला लव्हजिहाद च्या बळी ठरत असून आय टी क्षेत्राला लव्हजिहाद विळखा पडला असुन हि बाब फार गंभीर असून हिंदूना आत्मचिंतन करण्याची गरज आहे.राज्यात शेकडो मुली बेपत्ता होत असून यामागे लव्ह जिहाद्यांचे मोठे षडयंत्र आहे.असे महाराजांनी ठामपणे सांगितले.या अनेक अशा बाबी लक्षात घेऊन हिंदूंना जागृत करण्याचे करण्याचे काम साधुसंतांचे आहे जीवाची परवा न करता धर्माचे कार्य करीत असतात. धर्म मांडताना धर्म व राष्ट्र कळले पाहिजे.सर्वात सुरक्षित स्त्री हिंदू धर्मात आहे.असे सांगताना महाराज शेवटी म्हणाले की,हिंदू एकसंघ झाला पाहिजे ,तरुणांनी देशासाठी घडले पाहिजे, सर्वांना धर्मानुसार जगायचे असून धर्माच्या चौकटीत राहून जगायला शिकलं पाहिजे.कार्यक्रमात दरम्यान ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज व संघाचे प्रसादजी पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला साकळी मंडळातीलसाकळी,शिरसाड,वढोदे,नावरे,
चुंचाळे,बोराळे,वाघोदा,गिरडगाव,मनवेल,दगडी,थोरगव्हण,पिळोदा, पथराळे, शिरागड
अशा १४ गावातील हिंदू बांधव-महिला भगिनींनी, युवावर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन समितीचे अध्यक्ष सूर्यभान बडगुजर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत नेवे व आभार प्रदर्शन सुनील नेवे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी संमेलन समितीचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.







