Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 6, 2026
in ताज्या बातम्या
0

मुरबाड:/प्रशांत बाफना कल्याण- आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे टोकावडे येथे बस आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला आहे. अघातामध्ये स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जणं गंभीर जखमी आहेत. विठ्ठलवाडी-कल्याण-आहिल्यानगरला जाणारी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची धडक बसल्याने हा अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण-आहिल्यानगरसाठी सकाळी 8:30 वाजाता ही एसटी निघाली होती. मुरबाड तालुक्यातील टोकावडे- वैशाखरे हद्दीत स्कार्पिओ कारसोबत बसची धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले होते.


मुराबड- माळशेज घाट महामार्गावरील वैशाखरे वळणावर आज सकाळी भीषण अपघात घडला. एसटीबस आणि स्कार्पिओ कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन मुलांचा समावेश आहे, त्यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणाहून आहिल्यानगरच्या दिशेने जाणारी एसटी बस वैशाखरे येथील वळणावर आली असताना समोरुन येणार्‍या स्कार्पिओसोबत तिची जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षश: चुराडा झाला. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कल्याण – आहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे वळणाजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Previous Post

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण-आहिल्यानगर महामार्गावर एसटीबस, स्कार्पिओचा भीषण अपघात 4 जण ठार 4 गंभीर जखमी; मुरबाडच्या वैशाखरे टोकावडे येथील घटना

May 6, 2026

भुसावळात शिवसेनेचा इशारा; नसरापूर-केज अत्याचार प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा द्या!

May 6, 2026

पोलीस उपनिरीक्षक श्री .बाळासाहेब कोबरने यांचा लवकरच भव्य दिव्य नागरी सत्कार

May 4, 2026

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान…! दोन नंबर गेट बंद केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संताप…! प्रशासन मनमानीपणा आणि दुजाभाव करत असल्याचा आरोप…!

May 4, 2026

रावेर तालुक्यात भरदिवसा वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल प्रशासन झोपेत की संगनमत?

May 4, 2026

“४ मे ला ठरणार राहुरीचा राजा! आज मतमोजणीत कोणाची लागणार लॉटरी?”

May 4, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..