
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत ३५ अंश तर उपराजधानी नागपूरमध्ये ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात विर्दभात उन्हाचा तडाखा जास्त आहे. अकोला ४४ अंश तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. एव्हढच नाही तर जगातील पहिल्या १० उष्ण शहरांत विदर्भातील ४ शहरांचा समावेश झालाय. हवामान विभागाने पुढील ८ दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे पारा ४५ अंशांच्या पार जाण्याची शयता असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
दरम्यान वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने एसओपी लागू केलीय. विशेषतः असंघटित मजूर, डिलिव्हरी बॉय आणि खाणकामगारांसाठी तीन स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत.
उन्हाचा पारा वाढल्याने फळबाग आणि पिकांवरही त्याचा विपरती परीणाम होत असल्याचं शेतकर्यांचं म्हणणे आहे. तर विजेच्या मागणीतही मोठी वाढ होणार आहे. दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलंय. विशेषता उन्हामुळे मुलांना मळमळणं, चक्कर येणं आणि स्नायू दुखण्यासारखे त्रास जाणवतायत. मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं ते आजार जडू शकतात. त्यामुळे पालकवर्गाने सतर्क राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अजून दीड महिना उन्हाचा तडाखा असणार आहे.
विदर्भातील तापमान
अकोला ४४, यवतमाळ ४३, अमरावती ४३, वर्धा ४३, वाशिम ४३, गडचिरोली ४२, बुलढाणा ४२, नागपूर ४१, चंद्रपूर ४१, भंडारा ४१, ब्रह्मपुरी ४१, गोंदिया ४०.
पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सध्याची स्थिती निवळल्यावर (१९ एप्रिलनंतर) राज्यात काही ठिकाणी पावसाची शयताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी अकोल्यात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस इतया तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे.
अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एप्रिलमध्ये उष्णतेचा उच्चांक
अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिलमध्येच मे हिट जाणवू लागले आहे. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहोचला होता. गेल्या १६ वर्षांच्या इतिहासात एप्रिल महिर्यात पारा ४१ अंशावर जाण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० आणि २०१९ मध्ये एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता जाणवली होती. उष्णतेने नागरिक त्रस्त आहेत







