Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 16, 2026
in आरोग्य
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना
एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच महाराष्ट्र सर्वदूर तापलाय. मुंबईपासून नागपूरपर्यंत नागरीक हैराण झालेत. मुंबईत ३५ अंश तर उपराजधानी नागपूरमध्ये ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात विर्दभात उन्हाचा तडाखा जास्त आहे. अकोला ४४ अंश तापमानासह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलंय. एव्हढच नाही तर जगातील पहिल्या १० उष्ण शहरांत विदर्भातील ४ शहरांचा समावेश झालाय. हवामान विभागाने पुढील ८ दिवस उष्ण लाटेचा इशारा दिलाय. त्यामुळे पारा ४५ अंशांच्या पार जाण्याची शयता असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
दरम्यान वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने एसओपी लागू केलीय. विशेषतः असंघटित मजूर, डिलिव्हरी बॉय आणि खाणकामगारांसाठी तीन स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत.

उन्हाचा पारा वाढल्याने फळबाग आणि पिकांवरही त्याचा विपरती परीणाम होत असल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणे आहे. तर विजेच्या मागणीतही मोठी वाढ होणार आहे. दुसरीकडे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलंय. विशेषता उन्हामुळे मुलांना मळमळणं, चक्कर येणं आणि स्नायू दुखण्यासारखे त्रास जाणवतायत. मुलांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानं ते आजार जडू शकतात. त्यामुळे पालकवर्गाने सतर्क राहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात अजून दीड महिना उन्हाचा तडाखा असणार आहे.

विदर्भातील तापमान
अकोला ४४, यवतमाळ ४३, अमरावती ४३, वर्धा ४३, वाशिम ४३, गडचिरोली ४२, बुलढाणा ४२, नागपूर ४१, चंद्रपूर ४१, भंडारा ४१, ब्रह्मपुरी ४१, गोंदिया ४०.

पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सध्याची स्थिती निवळल्यावर (१९ एप्रिलनंतर) राज्यात काही ठिकाणी पावसाची शयताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी अकोल्यात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस इतया तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यभर कमाल तापमान अधिक नोंदविले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच एप्रिलमध्ये उष्णतेचा उच्चांक
अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिलमध्येच मे हिट जाणवू लागले आहे. मंगळवारी कमाल तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहोचला होता. गेल्या १६ वर्षांच्या इतिहासात एप्रिल महिर्‍यात पारा ४१ अंशावर जाण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१० आणि २०१९ मध्ये एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता जाणवली होती. उष्णतेने नागरिक त्रस्त आहेत

Previous Post

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

Next Post

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Next Post

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..