Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

साकळीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या जल्लोषात साजरा विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला,स्वाभिमान-अभिमानाचे दर्शन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 27, 2026
in शैक्षणिक
0

उपसंपादक:- मिलिंद जंजाळे
साकळी (ता. यावल) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, देशभक्तीच्या आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचा संपूर्ण परिसर तिरंग्याने सजवण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. “वंदे मातरम्”, “सारे जहाँ से अच्छा” यासारख्या गीतांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशाविषयीचा अभिमान व स्वाभिमान व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संचलनाने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी उपसरपंच वासिम खान हाजी आसिफ खान, शाळेचे मुख्याध्यापक रहीस खान महेमूद खान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शहीन शाह सलीम शाह,शिक्षक तज्ज्ञ सुफियान खान,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शेख अल्ताफ शेख गुलाम,शाहरुख खान तस्लिम खान, शेख मोहसीन शेख हारून यांच्यासह सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य, शिक्षकवृंद तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “देशाची घटना, लोकशाही मूल्ये व राष्ट्रीय एकात्मता जपण्याची जबाबदारी भावी पिढीवर आहे. विद्यार्थी हेच उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी कौतुक केले. देशभक्ती, शिस्त आणि एकतेचा संदेश देणारा हा प्रजासत्ताक दिन सोहळा साकळीकरांसाठी स्मरणीय ठरला.

Previous Post

पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

यावल नगरपरिषदेत प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा  लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

यावल नगरपरिषदेत प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा  लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छाया अतुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कल्याण येथे सिम्बिंयोसिस शाळेत अलियान तडवी आदिवासी विद्यार्थ्याने काठी फिरवून केले जोरदार प्रदर्शन

February 6, 2026

जळगाव जिल्ह्यात समता सैनिक दलाची दमदार ताकद उभी पूर्व व पश्चिम अशा दोन जिल्हा कार्यकारिणींची घोषणा; यावल तालुक्यात नव्या नेतृत्वाची निवड

February 6, 2026

पोटच्या मुलीला मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर लैंगिक अत्याचार पाचोरा तालुक्यातील नराधमा विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

February 6, 2026

यावल पंचायत समितीत आमदार अमोल जावळे यांची अचानक धडक  गटविकास अधिकारी गैरहजर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर संतापाचा स्फोट!

February 6, 2026

अतिक्रमणधारकांनी घेतला आयुक्तांचा धसका दुसर्‍या दिवशी माळीवाडा, एसटी स्टँड परिसरातील अतिक्रमणे हटवली

February 5, 2026

मराठीचा अपमान खपवून घेणार नाही : मनविसेचा विद्यापीठ प्रशासनाला कडक इशारा

February 5, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..