Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल (अनुसूचित जमाती) समाजाला शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ मिळावा, यासाठी भिमशक्ती सामाजिक संघटना, जळगाव यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये भारतीय राज्यघटनेतील कलम ४६ चा उल्लेख करून अनुसूचित जाती-जमाती व दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय उन्नतीसाठी शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संघटनेने चिखली खुर्द येथील आदिवासी बांधवांसाठी पुनर्वसन, शबरी योजनेचा लाभ, ट्रॅक्टर योजना, घरकुल योजना, तसेच अतिक्रमण नियमाकुल (कायम) करणे यासारख्या महत्त्वाच्या मागण्या निवेदनाद्वारे मांडल्या आहेत.

हे निवेदन भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील किशन जवरे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यात आले असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर निवेदनामुळे चिखली खुर्द परिसरातील आदिवासी समाजाच्या विकासाच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून आता प्रशासन यावर कोणती ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज दिनांक ०५/०५/२०२६ रोजी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जवरे, जिल्हा उपाध्यक्ष सागर कुरेशी, भुसावळ शहर प्रमुख विनोद पवार, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, यावल तालुका उपाध्यक्ष गोत्तम सुरवाडे, देविदास बागुल (ता. सचिव, यावल), सुनील भिल, प्रकाश भिल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

Next Post

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

Next Post

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

May 9, 2026

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

May 9, 2026

पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनलाडजळगाव परिसरातील पाझरतलाव दुरुस्ती व गोळेगाव तलावाच्या मध्यम प्रकल्पाची मागणी

May 9, 2026

पाथर्डी शहरात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..