Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

पिंपळगाव बुद्रूक प्राथमिक विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 27, 2026
in शैक्षणिक
0

शालेय समिती उपाध्यक्ष सौ. ताई सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण; वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता

भुसावळ: तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील प्राथमिक विद्या मंदिर शाळेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय समितीच्या उपाध्यक्ष सौ. ताई विलास सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

​ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतानंतर परिसरात दिलेल्या देशभक्तीपर घोषणांनी आणि गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्याला उपस्थित मान्यवरांकडून आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे, आदिवासी समाजातील महिला प्रतिनिधीला ध्वजारोहणाचा मान देऊन शाळेने एक आदर्श निर्माण केल्याबद्दल आयोजकांचे आणि ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले.

​या सोहळ्यासाठी गावचे सरपंच ज्ञानदेव धनसिंग मावळे, ग्रामपंचायत अधिकारी जगदीश इंगळे, सदस्य प्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सरोदे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

​प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण

२६ जानेवारीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने शाळेच्या समोरील भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जगदीश इंगळे आणि उपस्थित नागरिकांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडला.

Previous Post

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा अपमान!पालक मंत्री गिरीश महाजन यांनी भाषणात नाव न घेतल्याने महाराष्ट्रभर संतापाची लाट

Next Post

साकळीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या जल्लोषात साजरा विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला,स्वाभिमान-अभिमानाचे दर्शन

Next Post

साकळीतील जिल्हा परिषद उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या जल्लोषात साजरा विद्यार्थ्यांच्या देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला,स्वाभिमान-अभिमानाचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..