Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in क्राईम, शासकीय
0

स्पेशल रिपोर्ट प्रशांत बाफना
पोलिसांनी जर मनावर घेतलं तर अवैध धंद्यांचा खरोखरंच नायनाट करणं सहसासहजी शक्य आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून हे धंदे करणाऱ्यांचा असा गोड गैरसमज झालेला आहे, की ठराविक लालची पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हाताशी धरले, त्यांना या अवैध धंद्यातून मिळणाऱ्या काळ्या पैशांचा भला मोठा ‘मलिदा’ दिला, की आपण या जिल्ह्यात कशाही प्रकारचा ‘नंगानाच’ करु शकतो. अर्थात यासाठी हे अवैध धंदे करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात राजाश्रयदेखील मिळत आला आहे. त्यामुळेच अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू तस्करी, गोमांस तस्करी, गांजा तस्करी, चंदन तस्करी, सर्रासपणे सुरु आहे. पण आता यापुढे हे चालणार नाही. कारण अहिल्यानगर जिल्ह्यात एका ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘एंट्री’ झाली असून एसपी मुमम्का सुदर्शन असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. स्पष्टपणे सांगायचं झालं तर अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे आता याच ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ लागणार आहे. कारण पदभार घेताच अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच एसपी मुम्मका सुदर्शन ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. एसपी मुम्मका सुदर्शन यांनी इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर तब्बल १ कोटी ४६ लाखांची सुपारी जप्त केली.

काल (दि. ७) अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कर्नाटकहून नवीदिल्लीकडे जात असलेल्या लाल रंगाची सुपारी भरलेल्या मालट्रकची माहिती एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या ‘इन्फॉर्मेशन सोर्स’कडून त्यांना मिळाली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे यांना आदेश दिले. या आदेशानुसार लाल रंगाची सुपारी असलेले दोन मालट्रक अहिल्यानगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. एका ट्रकमध्ये ३१ हजार ५०० वजनाच्या ४५० गोण्या तर दुसऱ्या मालट्रकमध्ये २४ हजार ५०० किलो वजनाच्या ३५० लाल रंगाच्या सुपारीच्या गोण्या अशा एकूण ५६ हजार ००० किलो वजनाच्या ८०० गोण्या या कारवाईदरम्यान मिळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ कोटी ४६ लाख १५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही धडाकेबाज कारवाई एसपी मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिषिरकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार अजय नगरे, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब जंबे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत बुधवंत, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश मगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल सागर द्वारके यांनी केली. दरम्यान, भिंगार कॅम्प पोलिसांनीसुद्धा अशीच एक कारवाई केली आहे. अहिल्यानगर शहरातल्या सक्कर चौक भागात सुरु असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ४ लाख ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये रोख रक्कम २ लाख ३ हजार १० रुपये, २४ मोबाईल आणि काही दुचाकी वाहनं असा मुद्देमाल मिळून आला.

‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘साक्षात्कार’ घडवायलाच हवाय…!

अहिल्यानगर जिल्ह्यातले सर्वच नाहीत मात्र ठराविक पोलीस कर्मचारी अवैध धंदे करणाऱ्यांशी इतके काही एकरुप झाले आहेत, की अनेक प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये या पोलीस कर्मचाऱ्यांची भागीदारी असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. हॉटेल, ढाबे, वाळू तस्करी, बेकायदा दारु विक्री, चंदन तस्करी हे आणि असे अनेक अवैध धंदे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताने संपूर्ण अहिलयनगर जिल्ह्यात सुरु आहेत. या भागीदारीच्या पाठबळावर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी शहराच्या विविध भागांत जागा खरेदी करुन कोट्यवधी रुपयांचे बंगले बांधले आहेत. हे बंगले एखाद्या आमदार, खासदार किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना चक्रावून सोडतील इतके अलिशान आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांकडे दोन ते अडीच लाखांचे नामांकित कंपन्यांचे महागडे मोबाईल आहेत. एस.पी. मुम्मका सुदर्शन यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांना एकदा त्यांच्या खास ‘स्टाईल’मध्ये एकदा ‘साक्षात्कार’ घडवयलाच हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काळ्या काचांच्या महागड्या गाड्या, वाळू तस्करी आणि गावठी कट्टे…!

जेसीबी, हायवा, डंपर्स, पोकलेन या अत्याधुनिक साधनांच्या सहाय्याने अहिल्यानगर जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये वाळू तस्करी जोमात सुरु आहे. काही ठराविक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादासह राजाश्रय आणि संबंधितांशी ‘अर्थपूर्ण’ तडजोडीशिवाय हे धंदे करणं केवळ अशक्य आहेत. चंदन तस्करी करणाऱ्या अनेकांनी मोठमोठे बंगले बांधले आहेत. त्यांच्या या धंद्याचं ‘कनेक्शन’ थेट कर्नाटकपर्यंत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, वाळू तस्करीच्या पाठबळावर अनेकांनी इंडिवर, स्कॉर्पिओ आणि फॉर्चुनर अशा महागड्या गाड्या घेतल्या आहेत. वाळू तस्करीतल्या ‘व्हाईट कॉलर’ माफियांकडे रिव्हाल्वर किंवा गावठी कट्टा असणं हे या धंद्यातल्या प्रतिष्ठेचा एक अविभाज्य अंग आहे. काळा रंगाच्या गाड्यांना काळ्या काचा लावून अंगात खादीचे कपडे, हातात सोन्याचे ब्रेसलेट, गळ्यात सोन्याची जाडजूड साखळी घालून ही ‘माफिया’ मंडळी अहिल्यानगरच्या विविध भागांत स्वतःचा प्रचंड दहशत आणि धबधबा निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या वळचणीला हे माफिया गेले असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करू शकले नाहीत, असंदेखील बोललं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एसपी मुम्मका सुदर्शन यांच्या ‘सिंघम’ ‘स्टाईल’ची या जिल्ह्यातल्या नागरिकांना अपेक्षा आहे.

एसपी सर, तुमचा मोबाईल नंबर खुला करा…!

फार पूर्वी तत्कालीन अहमदनगर जिल्ह्यात एस. पी. डॉ. विश्वास नांगरे हे कार्यरत असताना त्यांनी एक ‘फंडा’ आणला होता. अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी फक्त २५ पैशांच्या पोस्टकार्डवर माहिती देण्याचं आवाहन या जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं होतं. त्यांच्या त्या आवाहनानुसार त्यावेळच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्यांना इतकी पोस्ट कार्ड पाठवली, की त्यांच्या कार्यालयात (एसपी चेंबर) पोस्ट कार्डांचा मोठा ढीग जमा झाला होता. अनेकांनी नांगरे पाटलांना अवैधधंद्यासंदर्भात पोस्टकार्डद्वारे माहिती दिली होती. आताचा जमाना हा माहिती तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) (एआय) आहे. या जमान्यात पोस्टकार्डची कल्पना कदाचित हास्यास्पद ठरेल. त्यामुळे एसपी मुम्मका सुदर्शन यांनी त्यांचा मोबाईल नंबर खुला केला तर वाळू तस्करी, चंदन तस्करी, गांजा तस्करी, सुगंधी तंबाखू तस्करी या आणि अशा अनेक अवैध धंद्यांची इतकी माहिती मिळेल, की त्या माहितीच्या आधारावर एसपी मुम्मका सुदर्शन यांना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांची पाळंमुळं नष्ट करणं सहजासहजी शक्य होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातले नागरिक ‘एसपी सर, तुमचा मोबाईल नंबर खुला करा’, अशी अप्रत्यक्षपणे मागणी करत आहेत

Previous Post

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून तरुणाचा जागीच मृत्यू वाघोदा-निंभोरा रस्त्यावर हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

May 9, 2026

सामाजिक कार्यकर्ते विनोद सोळंकी यांना सन्माननीय डॉक्टररेट पदवी व महात्मा गांधी उत्कृष्टता सेवा पुरस्कार प्रधान

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..