
नगरमधील साखरपुड्यातून चोरीस गेलेले लाखोंचे दागिने व रोकड मध्यप्रदेशातून हस्तगत
अहिल्यानगर – /प्रशांत बाफना केडगाव येथील साखरपुड्याच्या कार्यक्रमातुन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या विधीसंघर्षीत बालकाकडुन १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख २५,००० रुपये असा एकुण १७,३३,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील दुर्गम भागात ही कारवाई केली.
फिर्यादी सिंधु महेश माने वय ५२ धंदा -शिक्षक, रा. शेवगाव रोड तिसगाव, ता-पाथर्डी, जि-अहिल्यानगर यांनी दि ०३/०५/२०२६ रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथे येवुन फिर्याद दिली की, दि २/५/२०२६ रोजी माझा भाचा अशितोष नंदकुमार मरकड याचा साखरपुडा श्रेया गार्डन केडगाव अहिल्यानगर येथे असल्याने मी माझेकडील दागिने निळया रंगाच्या कापडी पिशवीमध्ये ठेवलेले होते तसेच मेहुणे नंदकुमार मरकड यांनी सहातोळे वजनाचे सोन्याचे गंठण व अर्धा तोळा वजनाची पिळयाची अंगठी नवरी व नवरदेव यांना भेट म्हणुन देण्याकरीता माझेकडे दिलेले होते. कार्यक्रम चालु असताना मी माझे नातेवाईकासंह फोटो काढणेसाठी स्टेजवर गेले. त्यानंतर माझे पाया जवळ ठेवलेली सोन्याचे दागिने असलेली पिशवी मिळुन आली नाही, ती कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेलेली आहे. वगैरे मजकुरानूसार कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३५३/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या गांभीर्य ओळखुन घटनास्थळी सी.सी.टी.व्ही. फुटेज हस्तगत करुन सदर गुन्हयाचा बारकाईने तपास करुन तांत्रीक विश्लेषनांच्या आधारे तसेच यापुर्वीच्या अशा स्वरुपाच्या गुन्हे करणाच्या पद्धतीचा बारकाईने अभ्यास करुन सदर गुन्हा हा वि.सं.बा.बालक वय ८ वर्ष, रा. कडीया सांसी, पोस्ट बोडा, तहसिल पचोर, जिल्हा राजगड, मध्यप्रदेश याने त्याच्या साथीदारासंह केला असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाली. त्यानूसार पोनि संभाजी गायकवाड यांनी स.पो.नि. कुणाल सपकाळे, पोहेकॉ विनोद बोरगे, पोहेकॉ विशाल दळवी, पोकॉ सुरज कदम यांचे पथक मध्यप्रदेश येथे तपासकामी तात्काळ रवाना केले व स्थानिक पोलीस स्टेशन बोडा, मध्यप्रदेश यांची मदत घेवुन दुर्गम व अती संवेदनशिल भागात कडीया सांसी, पोस्ट बोडा, तहसिल पचोर, जि-राजगड येथे जावुन सातत्याने अविरत ४ दिवस वि.सं. बालकाचा शोध घेतला. गुन्हयात चोरीस गेलेले सोन्याची दागिन्यांची एकुण किंमत १७,३३,००० रूपये संपुर्ण हस्तगत केलेले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. कुणाल सपकाळे हे करत आहेत.
सदरची कार्यवाही पाोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, स.पो.नि. कुणाल सपकाळे, पोउपनि प्रविण पाटील, पाोउपनि गणेश देशमुख, पोहेकॉ दळवी, पोहेकॉ बोरगे, पोहेकॉ दौड, पोहेकॉ साबीर शेख, पोहेकॉ राहूल शिंदे, पोहेकॉ संदिप पवार (एम.आय.डी.सी.पो. ठाणे) मपोहेकॉ रोहीणी दंरदले, मपोना वर्षा पंडीत, पोकॉ सुरज कदम, दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, रमेश शिंदे, अतुल कोतकर, सचिन लोळगे, अमोल गाडे , अतुल लाटे, अतुल काजळे, शिरीष तरटे, राहुल मासाळकर, गंगाधर आंग्रे, किरण बडे, मपोकॉ पल्लवी रोहकले तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंडु यांच्या पथकाने केलेली आहे. तसेच मध्यप्रदेश बोडा पो.ठाणे प्रभारी अधिकारी देवेंद्रसिंह राजपुत, पोकॉ कपिल अटारिया, पोकॉ दुष्यंत जाट, मपोकॉ पुजा मुवेल यांनी मदत केली







