Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा साठा जप्त खर्डा पोलिसांची मध्यरात्री कारवाई; टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 17, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
जामखेड येथे खर्डा पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून तब्बल 6 लाख 34 हजार 146 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मालवाहू टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जामखेड-मोरेवस्ती रोडलगत प्रोफेसर कॉलनी परिसरात दि. 15 मे रोजी रात्री सुमारे 10.25 वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपी बाळु ऊर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते (रा. बोराटे वस्ती, जामखेड) याच्या मालकीच्या महेंद्रा जितो मालवाहू बंद बॉडी टेम्पो (एमएच 12 एनएक्स 2183) मधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274 व 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई बाळु शांतीलाल खाडे (नेमणूक खर्डा पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
कारवाईदरम्यान डायरेक्टर स्पेशल, विमल, सुपर साऊंड, सम्राट, एम. सिलेक्ट, एमएनडी तसेच प्रीमियम शॉट या विविध कंपन्यांचा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त तंबाखूजन्य मालाची किंमत 2 लाख 59 हजार 146 रुपये असून मालवाहू टेम्पोची किंमत 3 लाख 75 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे, वैजिनाथ मिसाळ, धनराज बिराजदार,पोकॉ शशी मस्के व अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत

Previous Post

बापरे…! १८ दिवसांनी भारतातला इंधनसाठा संपणार…? अमेरिका- इराण – इस्रायल युद्धाचा आपल्या देशावर गंभीर परिणाम होणार…? नक्की काय परिस्थिती आहे, सविस्तर वाचा आणि चिंताग्रस्त न होता जाणून घ्या…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा साठा जप्त खर्डा पोलिसांची मध्यरात्री कारवाई; टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत

May 17, 2026

बापरे…! १८ दिवसांनी भारतातला इंधनसाठा संपणार…? अमेरिका- इराण – इस्रायल युद्धाचा आपल्या देशावर गंभीर परिणाम होणार…? नक्की काय परिस्थिती आहे, सविस्तर वाचा आणि चिंताग्रस्त न होता जाणून घ्या…!

May 17, 2026

बफर स्टॉकच्या नावाखाली कांद्याचे भाव पाडण्याचा डाव; कांदा विकू नये, कोण काय म्हणाले पहा

May 17, 2026

रावेर तालुक्यातील मोरव्हाल गावात तीव्र पाणीटंचाई, ग्रामस्थांचे पाण्याअभावी जीवन विस्कळीत पाण्यासाठी महिलांची पायपीट

May 17, 2026

आदिवासी एकता मंच महाराष्ट्र राज्य चा वार्षिक मेळावा यावल येथे उत्साहात संपन्न झाला

May 16, 2026

साकळी गावात गावठी पन्नी दारूविरोधात महिलांचा एल्गार१०० हून अधिक महिलांच्या सह्यांसह सरपंच दिपक नागो पाटील यांना निवेदन“अवैध दारू बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन” – ग्रामस्थांचा इशारा

May 16, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..