
उपसंपादक मन्सूर तडवी
यावल येथे १५ मे२०२६ रोजी आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच या सामाजिक संघटनेच्या वार्षिक मेळावा उत्साहात पार पडला
सभेचे उद्घाटन एकता मंच चे राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते महामानव बिरसा मुंडा क्रांतिवीर तंट्या मामा भिल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून यावल येथील नगरसेवक रुबाब आप्पा तडवी तसेच रशीद तडवी सर रत्नागिरी हे उपस्थित होते मंचकावर राज्य उपाध्यक्ष सलीम भूरेखा तडवी, राज्य सदस्य समीर गुलशेर तडवी जिल्हाध्यक्ष मेहरबान भाऊ तडवी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सत्तार भाई केदारे मौलाना जावेद जिल्हा सल्लागार इस्माईल तडवी सर न्हावी, महिला जिल्हाध्यक्ष मुन्ना ताई तडवी जिल्हा उपाध्यक्ष सब्दल भाऊ तडवी, जिल्हा उपाध्यक्ष फरीद भाऊ तडवी हे उपस्थित होते
या सभेमध्ये आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार व झालेला घटना याच्यावर संघटनेने केलेले कार्य याविषयी जळगाव बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यातील उपस्थित जिल्हाध्यक्ष यांच्याकडून आढावा घेण्यात आला
महिला सशक्तीकरणासाठी महिलांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये संघटनेमध्ये समाजकार्य करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांच्या समावेश करण्याचे ठरवले
नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व स्वागत सत्कार झाले, यामध्ये मेहरबान तडवी सर यावल तालुका सक्रिय सदस्य पदी नियुक्ती झाली
युनूस सायबु तडवी नायगाव यांची मराठवाडा विभाग प्रमुख तसेच जळगाव जिल्हा सल्लागार पदी नियुक्ती झाली
माजी यावल तालुका अध्यक्ष अशपाक भाऊ तडवी यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाली
तसेच मोहरद येथील उपसरपंच तसेच पत्रकार मन्सूर दादा तडवी यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली
यावल येथील कलीम तडवी यांची जिल्हा उप प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली
युनुस मयताब तडवी सावदा यांची जिल्हा सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली
यासीन सुभान परसाळे यांची यावल तालुका सचिव पदी
रुबाब निजाम वड्री यांची तालुका सदस्य पदी नियुक्ती झाली सुपडू इस्माईल सांगवी यांची तालुका सहसचिव पदी नियुक्ती करण्यात आली तसेच
जुम्मा गंभीर बोरखेडा यांची तालुका सदस्य खलील रमजान बिडगाव यांची चोपडा तालुका सदस्य निसार रशीद चोपडा तालुका सदस्य पदी नियुक्तीपत्र देण्यात आले
महिला आघाडीत रणरागिणी समीनाताई फिरोज तडवी न्हावी जिल्हा सचिव नियुक्ती झाली
यावल तालुका महिला सदस्य पदी भालोद येथील समीना ताई फिरोज यांचे नियुक्ती झाली सर्व नियुक्त्या बिनविरोध झाल्या
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले
१७ रोजी होणाऱ्या महापंचायत मध्ये उपस्थित राहण्या बाबत ठराव करण्यात आला
येणारा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचे असे ठरले
सभेच्या लेखाजोखा जिल्हा सचिव फत्तू भाऊ तडवी यांनी केला
सभेला जिल्हा सहसचिव जुम्मा भाऊ तडवी जिल्हा संघटक रब्बील भाऊ तडवी एकता मंच कर्मचारी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष दस्तगीर तडवी जिल्हा उपाध्यक्ष संजू भाऊ तडवी यावल तालुका उपाध्यक्ष फिरोज भाऊ तडवी पीरण दादा तडवी रावेर तालुका उपाध्यक्ष रियाज भाऊ तडवी कर्मचारी संघटनेचे जहांगीर भाऊ तडवी राजू तडवी निलेश तडवी यावल प्रमुख शाहरुख भाऊ तडवी सहप्रमुख बिल्ला दादा तडवी जिल्हा सदस्य अमित तडवी यावल जिल्हा महिला उपाध्यक्ष रेहानाताई तडवी साहिल मुसा तडवी खलील भाऊ तडवी उपस्थितांचे आभार यावल तालुका अध्यक्ष युसुफ भाई तडवी यांनी मानले तर कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेले राज्य सचिव इब्राहिम तडवी सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा चे मेसेज पाठवले, सभेचे सूत्रसंचालन राज्य सदस्य मनेष तडवी सर यांनी केले







