
उपसंपादक मन्सूर तडवी
रावेर- तालुक्यातील सातपुडा च्या पायथ्याशी आदिवासी पेसा क्षेत्रातील अति दुर्गमभागात आदिवासी मोरव्हाल गावामध्ये भर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे महिला व पुरुषांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगाच्या रांगा लावून पाण्याची व्यवस्था साठी वन वन फिरावे लागत आहे पाण्या अभावी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पाळलेले गुरेढोरे शेळ्या, म्हैस यांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. गावातील अनेक वस्ती आणि भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना व लहान मुलांना सकाळपासूनच पाणी भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक नागरिकांना दूरच्या भागातून पाणी आणावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. वाढत्या उन्हामुळे आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालली आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाकडून
टुबवेल मंजूरात करण्यात आली आहे परंतु पाणीपुरवठा अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे मोरव्हाल ही तीन गावांना जोडून पेसा क्षेत्रातील ग्रुप ग्रामपंचायत आहे
आणि गावातील समस्या सरपंच ग्रामविकास अधिकारी ऐकायला तयार नाही गावामधे आता पर्यंत कोणतीच ग्राम सभा घेण्यात आली नाहि
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात नियमित पाणीपुरवठा होत नसून अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही. पाण्याअभावी घरगुती कामांसह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून द्यावी आणि आदिवासी लोकांना या पिण्याच्या पाण्याच्या संकटातून मुक्त करून लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यात यावी नाही तर सर्व आदिवासी बांधव पंचायत समिती रावेर येथे पाण्याचे हंडे घेऊन ठिय्या आंदोलन करणार आहे असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.







