
हॅलो बातमीदार –
राहुरी तालुका । प्रविण पाळंदे
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या राहुरी शहरांमध्ये एका निसर्ग उपचार केंद्रामध्ये कोणतीच अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी एका मुन्नाभाई डॉक्टरच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे राहुरी तालुक्यात नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे .मिळाल्या माहितीनुसार राहुरी शहरातील तन्वीरदेशमुख हा गॅलेक्सी केंद्राच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करत होता मात्र त्याच्याकडे महाराष्ट्र कौन्सिलिंग ऑफ मेडिसिन अथवा नॅशनल कौन्सिलिंगची अधिकृत नोंदणी नसल्याचे तपसात समोर आले आहे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र नसतानाही सदर मुन्नाभाई तनवीर देशमुख हा रुग्णांवर उपचार करत असल्याचे निदर्शनात आले आहे तपासादरम्यान मुन्नाभाई डॉक्टरांनी विविध चिकित्सांचा वापर करून रुग्णांच्या आरोग्यास बाधक ठरतील असे औषध उपचार केल्याचे माहिती तपासी अधिकारी यांनी दिली याशिवाय या मुन्नाभाई ने आपल्या स्वतःच्या नावापुढे डॉक्टर ही पदवी लावून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोपही सदर मुन्नाभाई व करण्यात आला आहे .
याप्रकरणी राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर गणेश मिसाळ यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी संबंधित मुन्नाभाई डॉक्टर वर गुन्हा नोंदवला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहे .
सदर झालेल्या घटनेने राहुरी तालुका नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मुन्नाभाई यांचे धाबे दणादणाले आहे .
ही कारवाई राहुरी तालुक्यात नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण गावामध्ये होणार असल्याची माहिती आहे .सदर मुन्नाभाई डॉक्टर वर कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी प्रशासनाचे धन्यवाद मानले







