
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व सुरेश पगारे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या बैठकीला माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार सुनील भुसारा, निरीक्षक भास्कर काळे, महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ्फार मालिक, प्रमोद बापू पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक सुनील माळी, माजी नगरसेवक राजू मोरे आणि सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी सांगवीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त तालुकाध्यक्षांनी पक्ष वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.







