Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सोलर पंप योजनेच्या नावाखाली घोटाळा; नगरमध्ये ३८ शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक बनावट ग्राहक नंबरचा वापर | आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 27, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर |प्रशांत बाफना

महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत श्रीगोंदा तालुयात फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ३८ शेतकर्‍यांची सुमारे ५.४३ लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी वडाळी (ता.श्रीगोंदा) येथील अविनाश भाऊसाहेब काटे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. केडगाव येथील किरण आसाराम बोरुडे यांनी स्वतःकडे सोलर पंप योजनेची एजन्सी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्यांनी कोटेशन पद्धतीने अर्ज भरून त्वरित मंजुरी मिळवून देण्याचे तसेच १५ दिवसांत सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी शासन शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कमही शेतकर्‍यांकडून उकळण्यात आली.विश्वास ठेवून शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले. मात्र काही दिवसांनी सर्व अर्ज अचानक ब्लॉक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

चौकशीत धक्कादायक बाबी
प्राथमिक तपासात अर्ज भरताना आधी चुकीचे ग्राहक क्रमांक वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या ग्राहकांचे ग्राहक नंबर वापरून अर्ज सादर करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. यामुळे ही फसवणूक नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

फसवणुकीची रक्कम नऊ लाखांहून अधिक
या प्रकरणात ३८ शेतकरी बाधित झाले असून सुमारे ५.४३ लाखांची फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच आणखी काही शेतकर्‍यांचे पैसे अडकले असल्याने एकूण फसवणुकीची रक्कम ९ लाखांहून अधिक असण्याची शयता वर्तवली जात आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा
तक्रारदारांनी संबंधित आरोपीवर तत्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, तसेच सर्व बाधित शेतकर्‍यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फसवणूक करणारा एजंट किरण आसाराम बोरुडे यांनी यापूर्वी अनेक तालुयांमध्ये फसवणूक केल्याचे समजत आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यासह सहकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता त्यांच्या हाती मोठे धागेदोरे व रॅकेट सापडू शकते, असे शेतकर्‍यांचे मत आहे

Previous Post

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

Next Post

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Next Post

गाळमुक्त धरणांमुळे शिवाराला नवे जीवन!आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

May 19, 2026

मिम भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शेख यांची नियुक्ती

May 19, 2026

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

May 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..