Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 27, 2026
in राजकीय
0

बीड/प्रशांत बाफना
राजकारण संपल्यानंतर मी सुद्धा हरिभक्त पारायणाकडे जाणार असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील भायाळा गावात आयोजित नारळी सप्ताहात त्यांनी हभप होणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी त्यांनी जनतेच्या प्रेमाबद्दल आभार मानले. गोपीनाथ मुंडे यांचे नाव घेत त्यांनी मोठे भावनिक आवाहनही केले.भायाळा गावात नारळी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे या बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी श्रीराम नवमी उत्सवात सहभाग घेतला. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा पराभवानंतर काही लोकांनी आत्महत्या केल्या. इतकं प्रेम भावांनी आपल्यावर केल्याचे त्या म्हणाल्या. तर भगवान गडावर माऊली मंदिराची उभारणी सुरू आहे. या मंदिराला सढळ हाताने कोट्यवधींची मदत करणाऱ्या देणगीदारांची पंकजा मुंडे यांनी पदराने दृष्ट काढली.

तर या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील नारळी सप्ताहात घातली

Previous Post

वनविभागाचा सापळा यशस्वी; 15 लाखांचा डिंक जप्त, अवैध गोडाऊन उघड

Next Post

सोलर पंप योजनेच्या नावाखाली घोटाळा; नगरमध्ये ३८ शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक बनावट ग्राहक नंबरचा वापर | आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

सोलर पंप योजनेच्या नावाखाली घोटाळा; नगरमध्ये ३८ शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक बनावट ग्राहक नंबरचा वापर | आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

May 19, 2026

मिम भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शेख यांची नियुक्ती

May 19, 2026

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

May 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..