
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
मिम भिम या सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शाहिद शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
हे नियुक्तीपत्र मिम भिम सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हुसेन शेख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अमन सय्यद, साहिल सय्यद, तेजस कापसे, शाहिद शेख किरण सूर्यवंशी, भूषण बनसोडे, साबिर शेख, आफान शेख, नाझीम जागीरदार आदि यावेळी उपस्थित होते.
नियुक्तीपत्र दिल्यानंतर परवीन शेख म्हणाल्या संघटना वाढीसाठी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणार आणि त्यांना न्याय देण्यासाठी आंदोलन, मोर्चा, काढणार असल्याने सांगितले.






