Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

फैजपूर डी.एन. कॉलेजमध्ये १२ वी परीक्षेदरम्यान बैठे पथकातील कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल गट शिक्षण अधिकारी यांचा दबाव की चिरीमिरी?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 19, 2026
in शैक्षणिक
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
डी.एन. कॉलेज फैजपूर येथे सुरू असलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष बैठे पथक नियुक्त केले होते. मात्र परीक्षेच्या संवेदनशील काळातच बैठे पथकातील एका कर्मचाऱ्याची अचानक दुसऱ्या केंद्रावर ड्युटी बदलण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
कॉपी रोखण्यासाठी नेमलेले पथकच कमजोर करण्याचा गट शिक्षण अधिकारी यांचा प्रयत्न तर नाही ना? असा सवाल आता विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. परीक्षेच्या मध्यावरच कर्मचाऱ्याची नियुक्ती मध्ये बदल झाल्याने निर्णयामागील कारणांबाबत संशय व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर अशी चर्चा रंगली आहे की, काही दबावाखाली येऊन किंवा “चिरीमिरी”च्या माध्यमातून हा निर्णय घेतला गेला का? गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अचानक ड्युटी बदलण्यामागील ठोस कारण स्पष्ट न केल्याने संशय अधिकच बळावत आहे.
परीक्षा काळात अशा प्रकारची नियुक्तीत बदल झाल्यामुळे कॉपीमुक्त मोहिमेवर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि संवेदनशील काळातील निर्णयामुळे प्रशासनाच्या व गट शिक्षण अधिकारी यावल. यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार गट शिक्षण अधिकारी यावल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि कॉपीमुक्त वातावरण कायम राहावे, यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रश्न असा — परीक्षेच्या काळात अचानक नियुक्ती बदलण्यामागे नेमके कारण काय?
दबाव, शिफारस की आर्थिक व्यवहार झाला आहे का ?
याचे उत्तर शिक्षण विभाग देणार का — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर

Next Post

आदिवासी एकता मंच यावल तालुका उपाध्यक्षपदी फिरोज तडवी, जिल्हा सहसचिवपदी जुम्मा तडवी यांची निवड

Next Post

आदिवासी एकता मंच यावल तालुका उपाध्यक्षपदी फिरोज तडवी, जिल्हा सहसचिवपदी जुम्मा तडवी यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..