Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भुसावळ एमआयडीसी अवैध उत्खनन प्रकरणातील मुख्य ‘मुरुम माफियांवर’ गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन – रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 18, 2026
in क्राईम
0

तालुका प्रतिनिधी: राहुल जयकर

भुसावळ तालुक्यातील किन्ही व कन्हाळे बुद्रुक परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या कोट्यवधींच्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात प्रशासनाने केवळ शासकीय विभागावर दंडात्मक कारवाई करून मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे. या प्रकरणातील मुख्य कंत्राटदार आणि मुरुम माफियांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास तहसील कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
रिपब्लिकन सेनेने केलेल्या तक्रारीनंतर महसूल विभागाने एमआयडीसीच्या जळगाव उपविभागावर ४७,३२,२४० रुपयांचा दंड ठोठावला असून एका डंपरवर २,३९,२३० रुपयांची कारवाई केली आहे. मात्र, ही कारवाई केवळ कागदोपत्री तर नाही.कारण मुरुम चोरी करणारे जेसीबी, पोकलेन मालक आणि कंत्राटदार अद्याप मोकाट आहेत.सदर ठिकाण रहदारीचे असल्याने तेथुन संबंधित महसूल अधिकाऱ्यांची ये जा चालू असते परंतु यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले
निवेदनातील प्रमुख मागण्या व मुद्दे
1) केवळ एमआयडीसीवर दंड आकारून भागणार नाही, तर प्रत्यक्षात चोरी करणाऱ्या कंत्राटदारांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३७९, ४३४ आणि पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत.

2) प्रशासनाने मोजलेले ३९७ ब्रास उत्खनन संशयास्पद असून, प्रत्यक्षात हे उत्खनन २,००० ब्रासपेक्षा जास्त आहे. यासाठी ‘ड्रोन’ किंवा ‘डीजीपीएस’ तंत्रज्ञानाचा वापर करून पुनर्मोजणी करावी.

3) ‘आशा कन्स्ट्रक्शन’ (डंपर क्र. MH19 CY 0438) व इतर कंत्राटदारांनी हा चोरीचा मुरूम ज्या सरकारी किंवा खाजगी कामांवर वापरला, त्याचे ‘मटेरियल ऑडिट’ करावे.

4) संबंधित कंत्राटदारांची बिले रोखून त्यांना भविष्यात कोणत्याही शासकीय निविदेत सहभागी होण्यापासून कायमस्वरूपी बंदी (Blacklisting) घालावी.

5) महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार अवैध उत्खननात वापरलेली सर्व अवजड यंत्रसामग्री जप्त करावी.

या प्रकरणात मोठे रॅकेट सक्रिय असून महसूल, भूविज्ञान आणि खनिकर्म विभागाची संयुक्त समिती (SIT) नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या १० दिवसांत मुख्य सूत्रधारांवर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
याप्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, बंटी नरवाडे, स्वप्नील सोनवणे, बंटी सोनकांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

Next Post

जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर

Next Post

जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलिस नाईक झाले हवालदार.. पदोन्नतीचा आदेश जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..