Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 11, 2026
in आरोग्य
0

उपसंपादक :- मिलिंद जंजाळे
साकळी — ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समोर आले आहे. गरोदर मातांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका गेल्या महिनाभरापासून केवळ डिझेल नसल्यामुळे जागेवरच उभी असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका बंद पडण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे रुग्ण कल्याण समिती बंद करण्यात आल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. समितीचे खाते रिकामे करण्याच्या सूचनांनंतर इंधनासाठी निधी उपलब्ध नसल्याने स्थानिक पेट्रोल पंपाचे सुमारे ४० हजार रुपये थकीत असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, डिझेलअभावी रुग्णवाहिका सेवा पूर्णपणे थांबली आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असताना संबंधित विभागाकडून कोणतीही तातडीची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. ग्रामीण भागात खासगी वाहनांची उपलब्धता मर्यादित असते. अशावेळी शासकीय रुग्णवाहिका हीच गरोदर माता आणि गंभीर रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. मात्र सध्या हीच सेवा बंद असल्याने रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत विचारले आहे की,
“शासनाच्या योजना कागदावरच आहेत का? गरोदर मातांसाठी असलेली सेवा डिझेलअभावी बंद पडते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब नाही का?”
आरोग्य विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून थकीत देयके अदा करावीत, रुग्णवाहिकेला तत्काळ इंधन उपलब्ध करून सेवा पूर्ववत सुरू करावी आणि या प्रकाराला जबाबदार असलेल्या यंत्रणेची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील हा हलगर्जीपणा वेळेत दुरुस्त झाला नाही तर एखादी जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.

Previous Post

शिरसाड येथे किनगाव श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत  तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पूजन, महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

Next Post

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Next Post

नगरमध्ये तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; भरवस्तीत चोरीचा धुमाकूळ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..