Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शिरसाड येथे किनगाव श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत  तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पूजन, महाप्रसादाने भक्तिमय वातावरण

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 10, 2026
in धार्मिक
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
वारकरी संप्रदायाच्या भक्तीमय परंपरेचा उत्साह आणि श्रद्धेचा संगम अनुभवायला मिळाला तो किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीच्या शिरसाड येथील भव्य स्वागत सोहळ्यात. दिनांक १० फेब्रुवारी रोजी शिरसाड येथे पाटील परिवाराच्या वतीने दिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी यावल तालुक्याच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांच्या हस्ते दिंडीचे विधिवत पूजन करण्यात आले.
शिरसाड ग्रामपंचायतीचे मा. उपसरपंच तथा वि.का. सोसायटी संचालक धनंजय पाटील सर, आर. ई. पाटील सर व संपूर्ण पाटील परिवाराने आपल्या राहत्या घरी दिंडीतील वारकऱ्यांसाठी स्वागत सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी पाटील परिवाराचे व्याही, अमळनेर तालुक्यातील लोंढवे गावाचे लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाला यावल नगरपरिषदेचे नगरसेवक, शेतकी संघाचे संचालक मंडळ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत शिरसाड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाटील परिवाराकडून स्नेहभोजन देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावल–रावेर विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार अमोल दादा हरिभाऊ जावळे तसेच चोपडा विधानसभेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दूरध्वनीद्वारे दिंडीतील सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सांगता करताना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा. उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांनी उपस्थित मान्यवर, वारकरी व सर्व भक्तगणांचे आभार मानले. संपूर्ण सोहळा भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचा आदर्श ठरला.

Previous Post

२४ तास, ४० विभाग आणि लाखो भक्त! शिर्डीच्या ‘दिव्य’ व्यवस्थेची ही आहे खरी ताकद! ६००० हातांची अविरत सेवा आणि अंगावर शहारे आणणारा भक्तिमय प्रवास!

Next Post

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

Next Post

डिझेलअभावी साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका ठप्प गरोदर मातांची जीवाशी खेळ! जबाबदार कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..