Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

लग्नाच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणूक!विवाहितेला नववधू भासवून विवाह, सात जणांचा रॅकेट उघडयावल पोलिसांची धडक कारवाई; सर्व सात संशयित ताब्यात, १.७० लाखांची रोकड व दागिने जप्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 5, 2026
in क्राईम
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत एका ३५ वर्षीय अविवाहित तरुणाची तब्बल २ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार यावल तालुक्यात उघडकीस आला आहे. विवाहित महिलेलाच नववधू म्हणून उभे करून, बनावट नातेवाईक तयार करत दलालांनी विवाह लावून दिला आणि लग्नानंतर पसार होण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र तरुणाच्या सतर्कतेमुळे हे संपूर्ण रॅकेट उघड झाले असून यावल पोलिसांनी सातही संशयितांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे.
कसा झाला फसवणुकीचा पर्दाफाश?
मालोद (ता. यावल) दिनेश शालिक पाटील (वय ३५) हा अविवाहित तरुण नोकरी नसल्याने विवाह जुळत नसल्याचा फायदा घेत दलालांनी “लग्न करून देतो” असे आमिष दाखवले.
वधू, दागिने व इतर खर्चासाठी दलालांनी २ लाख ५४ हजार रुपये उकळले. त्यानंतर १२ जानेवारी रोजी मालोद येथे विवाह सोहळा पार पडला.
मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव कृतिका ऋतिक जावरे, रा. बादशर, ता. भडगाव) हिने “माझ्या मावसभाऊचा अपघात झाला आहे” असे सांगून गावी जाण्याचा हट्ट धरला.
मावसभाऊचे नाव, गाव, काम, अपघाताचा तपशील विचारताच तिची उत्तरे विस्कळीत झाली आणि संशय बळावला.
थेट पोलीस ठाण्यातबनावट लग्नाचा भांडाफोड
संशय आल्यानंतर दिनेश पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी १३ जानेवारी रोजी नववधूस थेट यावल पोलीस ठाण्यात आणले.
सखोल चौकशीत हे लग्नफसवणूक रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले. पैसे घेऊन विवाह लावायचा आणि नंतर वधू पसार होण्याची पद्धत या टोळीने अवलंबल्याचे उघड झाले.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल; टप्प्याटप्प्याने अटक
दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व सहायक फौजदार वसंत बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आरोपींना अटक करण्यात आली.पुनम सुरेश भिल्ल (रा. अडावद, ता. चोपडा)
दिव्या लक्ष्मण पवार (खरे नाव कृतिका ऋतिक जावरे)
मनोहर युवराज अहिरे (रा. अमरदे, ता. शिंदखेडा, जि. धुळे)
बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील (रा. अजंदे, ता. शिरपूर, जि. धुळे) बनावट आई, बनावट आत्या व बनावट आजी काही आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर महिलांनी तपासात सहकार्य व मुद्देमाल जमा केल्याने त्यांना नोटीसवर सोडण्यात आले आहे.
१.७० लाखांची रोकड, दागिने जप्त या प्रकरणात पोलिसांनी—
१ लाख ७० हजार रुपये रोकड
चांदीचे दागिने, साड्या, बेंटेक्स मंगळसूत्र अंदाजे ४,२६१ रुपयांचा ऐवज असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दलालांपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
ग्रामीण भागात “पैसे दिल्यास लग्न करून देतो” असे आमिष दाखवणाऱ्या दलालांपासून नागरिकांनी सावध राहावे, अशा टोळ्या लग्नानंतर वधूला पळवून नेऊन आर्थिक फसवणूक करतात, असे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारेयांचे दुःखतः निधन .

Next Post

शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने श्री .शिवाजीराव कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा .

Next Post

शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने श्री .शिवाजीराव कपाळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..