Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

सोनारीत परंपरेनुसार काळभैरव यात्रा उत्साहात पार पडली.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
February 2, 2026
in धार्मिक
0

(प्रतिनिधी : अमोल खरात)
जामनेर : जामनेर तालुक्यातील सोनारी गावात परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेली काळ भैरव यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त गावात पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
काळ भैरव मंदिरात पहाटे अभिषेक, महापूजा, आरती तसेच विविध धार्मिक विधी विधीवत पार पडले. यात्रेदरम्यान भजन-कीर्तन, हरिपाठ व पालखी मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविकांनी दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावल्या होत्या.
यात्रेच्या निमित्ताने सोनारी गावात विविध दुकाने, खेळणी, मनोरंजनाची साधने तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे यात्रेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते व ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामपंचायत, स्वयंसेवक व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत व उत्साहात पार पडल्याने ग्रामस्थांनी तसेच यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Previous Post

रावेर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक; 13 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गावातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना वेळीच आळा बसणे ही काळाची गरज :- मोहनराव देशमुख

Next Post

गावातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना वेळीच आळा बसणे ही काळाची गरज :- मोहनराव देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..