Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 6, 2026
in सामाजिक
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल येथील तालुका शेतकी संघात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तर पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात आला.
येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मंगळवारी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील, नगरसेवक हेमराज फेगडे, नगरसेवक योगेश चौधरी, चेतन अढळकर,रितेश बारी सह मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेखर पटेल,सुधीर चौधरी, सुनील गावडे,तेजस यावलकर,प्रमोद वाणी, भरत कोळी,विक्की वानखेडे, गोकुळ तायडे, मिलिंद जंजाळे, फिरोज तडवी, दीपक नेवे, राजू पिंजारी या पत्रकारांचा पुष्प, पेन देऊन शेतकी संघाचे संचालक तेजस पाटील यांनी पत्रकार दिनानिमित्त सन्मानित केले. त्याचप्रमाणे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले. गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल व रक्तपेढीच्या डॉ.श्रद्धा उबाळे, डॉ. कृणाल ढोबळे, डॉ.लक्ष्मण पाटील, डॉ. दिनेश भोळे, डॉ.रुपेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील पार पडले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेखर पटेल यांनी केले तर आभार तेजस यावलकर यांनी मानले.

Previous Post

भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा

Next Post

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घरात कोंडले घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन पहारा, लोकप्रतिनिधीच्या बॉडीगार्डचे कृत्य

Next Post

नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घरात कोंडले घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन पहारा, लोकप्रतिनिधीच्या बॉडीगार्डचे कृत्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

परसाडे येथे आदिवासी तडवी- भिल समाजाचा सामुहिक विवाह सोहळा संपन्न

April 16, 2026

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, पुढील काही दिवस उष्णतेची लाट…मुंबईत ३५ तर अहिल्यानगर, नागपूरमध्ये ४१ अंश तापमान

April 16, 2026

राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मनाई आदेश जारी;जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले….

April 16, 2026

साकळी येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

शेठ ला. ना. सा.विद्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात

April 15, 2026

कासोद्यात पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ‘ऑपरेशन हातभट्टी १२०० लिटर अवैध दारू रसायनाचा जागेवरच केला नाश.

April 12, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..