Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

भारत- अमेरिकेत पुन्हा तनाव; व्हेनेझुएलानंतर आता ट्रम्प यांचा भारताला इशारा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
January 6, 2026
in देश-विदेश
0

विशेष प्रतिनिधी प्रशांत बाफना
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलाच्या कारवाईनंतर चर्चेत आलेल्या ट्रम्प यांनी व्यापार आघाडीवर भारताला थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर त्यावर कर आणखी वाढवता येऊ शकतात. ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी योचे कौतुक केले, त्यांना “ चांगला माणूस’ म्हटले. परंतु राष्ट्रीय हितसंबंध आणि व्यापार धोरणांच्या बाबतीत ते कोणतीही सवलत देणार नाहीत, असे त्यांनी सूचित केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, भारताचा रशियासोबतचा तेल व्यापार हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदींना माहित आहे की, ते या करारावर नाराज आहेत. ट्रम्प यांनी इशारा दिला की, जर भारताने रशियाकडून तेल आयात कमी केली नाही तर लवकरच भारतावरील कर वाढवले जातील. ट्रम्प यांच्या या धोरणाकडे भारताला रशियापासून दूर करण्याचा आणि अमेरिकन उर्जा बाजारपेठेकडे वळणवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

ट्रम्प प्रशासनाने ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर 50 टक्के मोठ्या प्रमाणात कर लादला होता. या वादाचे मुख्य कारण म्हणजे ट्रम्प यांना भारताने आपले दुग्धजन्य पदार्थ आणि कृषी क्षेत्रे अमेरिकन कंपन्यांनसाठी पूर्णपणे खुली करावीत असे वाटते. दुसरीकडे, भारत आपल्या देशांतर्गत अर्थव्यवस्थेचे आणि शेतकर्‍याच्या हिताचे रक्षण करण्याच्या निर्णयावर ठाम आहे. या व्यापार संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ चाललेला व्यापार करारही अडचणीत आला आहे.

दरम्यान ट्रम्प यांच्या अलिकडील इशार्‍यामुळे भारत- अमेरिकेच्या राजनैतिक वर्तुळात तणाव वाढला आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार राहिला आहे. अमेरिकन प्रशासनाचा असा विश्वास आहे की, स्वस्त रशियन तेलाद्वारे भारत आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा मिळवून देत आहे, जे अमेरिकेच्या भू-राजकीय हिताच्या विरुद्ध आहे. ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील वैयक्तिक मैत्रीची अनेकदा चर्चा हेत असताना, व्यापार युद्ध आणि कर यासारख्या मुद्यांवरून या मैत्रीची परीक्षा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या दबावासोबत भारत आपली धोरणात्मक स्वायत्तता कशी संतलित कतो, हे पाहणे महत्वाचे आहे

Previous Post

मारुळ येथे शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद…पंचायत समिती यावल अधिकारी वर्गाने फिरवली पाठ ….

Next Post

यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

Next Post

यावल येथील शेतकी संघात पत्रकार दिन साजरा, रक्तदान शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक! जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल; फिर्यादीत रवीराज साबळेंचाही उल्लेख

May 31, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पाथर्डीच्या मायलेकीचा जागीच मृत्यू

May 31, 2026

मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री उपोषण सोडले सरकार सोबतची प्रदिर्घ चर्चा, लेखी अश्वासनावर अभ्यसकांच्या एकमतानंतर जरांगे पाटलांचा निर्णय

May 31, 2026

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी धनंजय देशमुखसोबत राहू नको, प्रकरण मिटवून घे; ..अन्यथा जीवे ठार मारू

May 31, 2026

पोलीस अधीक्षकांचा धडक निर्णय: परस्पर ‘ संलग्न’ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश; दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई!

May 31, 2026

मराठा आरक्षणाची धग: रणरणत्या उन्हात, खुल्या मैदानात जरांगे पाटलांचे अमरण उपोषण , 14 मागण्यांचे सरकारडून 14 अश्वासनं;पहिल्याच दिवशी आंदोलनाचे राज्यभरात तीव्र पडसाद

May 30, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..