Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

यावल नगरपरिषद निवडणूक तयारीला वेगजिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पाहणी; तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या नियोजनाची प्रशंसा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
November 27, 2025
in शासकीय
0

उपसंपादक:-मिलिंद जंजाळे
27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल नगरपालिका कार्यालय तसेच तहसील कार्यालय येथे येऊन नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील सर्व कामकाजाची सखोल पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने आखलेल्या तयारीचे त्यांनी बारकाईने परीक्षण केले.
तहसील कार्यालयात स्ट्रॉंग रूम, सिलिंग सेटिंग तसेच काउंटिंग सेंटरची प्रत्यक्ष पाहणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी, सीसीटीव्ही व्यवस्थापन, प्रवेश-नियंत्रण व्यवस्था, साहित्य साठवण व प्रोटोकॉल पालन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी यावल तहसीलदार तथा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नाझिरकर, यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे, तसेच नगरपालिका व तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
निरीक्षणादरम्यान जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावल तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेची आखणी अत्यंत नीटनेटकी व शिस्तबद्ध पद्धतीने केल्याबद्दल तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचे विशेष कौतुक केले. सर्व विभागांमधील समन्वय, तांत्रिक तयारी, सुरक्षा उपाययोजना आणि निवडणूक साहित्य व्यवस्थापन समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावल नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून सर्व कामकाज प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या या पाहणीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून निवडणुकीच्या तयारीला आणखी गती मिळाल्याचे दिसून आले.

Previous Post

यावल निवडणुकीत भूकंप! दिग्गजांची चमक फिकी – मतदारांचा कौल बदलाच्या मार्गांवर?

Next Post

उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांच्याकडून डॉ.गौरी च्या कुटुंबीयांचे सांत्वन

Next Post

उपसभापती डॉ.निलम गोर्‍हे यांच्याकडून डॉ.गौरी च्या कुटुंबीयांचे सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक प्रकार : साकळी येथे दूषित दुधाचा प्रकार उघड – ग्राहकांमध्ये संतापाची लाट

April 22, 2026

यावल पोलिस स्टेशनमध्ये सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ साकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

April 22, 2026

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

April 22, 2026

शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

April 20, 2026

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

April 18, 2026

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

April 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..