Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 22, 2026
in शासकीय
0

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य
३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त
अहिल्यानगर, /प्रशांत बाफना — राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून २३ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात एकूण ३ लाख ३३ हजार ५४५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे, मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून, त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
वेळ व श्रमाची बचत व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी थेट त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवरच पोहोचायचे आहे. ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत (Sector Officers) थेट या मतदान केंद्रांवरच पोहोच केले जाणार आहे. तसेच, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करावयाचे आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत ३६ पोलीस अधिकारी, ७०८ पोलीस कर्मचारी आणि ३९१ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ची एक तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची (CRPF) एक प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व ३७४ मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ द्वारे थेट लक्ष ठेवले जाणार आहे.
मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही आपला हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाने १२ पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश असून यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे.
मतदारसंघातील १ लाख ७२ हजार २३१ पुरुष, तसे १ लाख ६१ हजार ३१२ स्त्री आणि ०२ इतर मतदारांनी २३ एप्रिल रोजी लोकशाहीच्या या उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच निवडणुकीत सर्व पात्र मतदारांनी उर्त्स्फूतपणे सहभागी हाेउन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी केले आहे.

Previous Post

शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

Next Post

यावल पोलिस स्टेशनमध्ये सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ साकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

Next Post

यावल पोलिस स्टेशनमध्ये सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ साकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक प्रकार : साकळी येथे दूषित दुधाचा प्रकार उघड – ग्राहकांमध्ये संतापाची लाट

April 22, 2026

यावल पोलिस स्टेशनमध्ये सुसज्ज ‘हिरकणी कक्ष’ साकार; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल

April 22, 2026

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

April 22, 2026

शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

April 20, 2026

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

April 18, 2026

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

April 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..