Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

मंडप टाकणार नाही…रणरणत्या उन्हात उपोषण करणार.. मेलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार .

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 28, 2026
in सामाजिक
0

बीड/प्रशांत बाफना
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी आरक्षणासाठी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. यावेळचं उपोषण अत्यंत कठोर होणार आहे. देशात असं उपोषण झालं नसेल असं उपोषण करणार आहे. 30 तारखेला उपोषण सुरू होईल. मंडप टाकणार नाही. सावलीत बसणार नाही. थेट रणरणत्या उन्हात बसणार आहे. मी उष्माघाताने मेलो तर त्याला सरकारच जबाबदार असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असीतल, असा इशाराच जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत आज पत्रकार परिषद घेतली. भाजपचे नेते प्रसाद लाड हे जरांगेंना भेटायला आले होते. पण त्यानंतरही सरकार दरबारी आरक्षणासाठी काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे हे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या बोलण्यातून उद्वेग आणि संताप दिसत होता. त्यातूनच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. मी येत्या 30 तारखेला उपोषणा बसणार आहे. आमरण उपोषण असणार आहे. देशात झालं नसेल असं उपोषण होणार आहे. मागच्यावेळी उपोषण करताना मंडप टाकला होता. यावेळी मंडप टाकला जाणार नाही. मी सावलीत बसून उपोषण करणार नाही. असाच जाऊन बसणार आहे. मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मी बसणार आहे. मेलो तर मेलो. कुणीही समाजबांधवांनी अंतरवलीकडे येऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. तुम्हाला फक्त मराठ्यांचीच मते हवी आहेत का? बाकी गरीबांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे

Previous Post

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल मिळू शकत स्वस्त..खा.लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला मार्ग

Next Post

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

Next Post

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

May 28, 2026

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

May 28, 2026

मंडप टाकणार नाही…रणरणत्या उन्हात उपोषण करणार.. मेलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार .

May 28, 2026

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल मिळू शकत स्वस्त..खा.लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला मार्ग

May 28, 2026

अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 27, 2026

प्रशासकीय बेजबाबदारपणाचा कळस! ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाघ नगरवासीय ३ दिवसांपासून पाण्याविना तहानलेले

May 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..