Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 28, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना
शहरातील नगर-मनमाड रोडलगत असलेल्या ॲक्यूम मसाज पार्लर / स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मध्यरात्री छापा टाकून देहविक्रीचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक, मॅनेजर, मदतनीस आणि एका ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई दि. 27 मे रोजी रात्री उशिरा करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नगर-मनमाड रोडवरील साई मिडास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ॲक्यूम स्पा सेंटरमध्ये महिलांना मसाज सेंटरच्या नावाखाली बोलावून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. बनावट ग्राहकाकडे 500 रुपयांच्या आठ नोटा देण्यात आल्या होत्या. ग्राहकाने स्पा सेंटरमध्ये जाऊन शरीरसंबंधासाठी महिलेची मागणी केल्यानंतर पोलिसांना खात्री पटली आणि रात्री सुमारे 11.35 वाजता पोलिस पथकाने स्पा सेंटरवर छापा टाकला.

कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये दोन कर्मचारी आढळून आले. त्यांची नावे अनिकेत अशोक बचाटे (रा. करमाळा, जि. सोलापूर) व काळुराम भिमा समिंदर (रा. शिरूर, जि. पुणे) अशी आहेत. चौकशीत स्पा सेंटरचा मालक संतोष गणेश बघे (रा. संभाजीनगर) असल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या झडतीत रोख रक्कम, बनावट ग्राहकाकडून देण्यात आलेल्या नोटा, चार मोबाईल हँडसेट, इतर साहित्य असा एकूण 60 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.स्पा सेंटरमधील वेगवेगळ्या रूमची तपासणी केली असता एका खोलीत बनावट ग्राहकासोबत महिला आढळून आली. तसेच दुसऱ्या खोलीत एक ग्राहक आणि महिला मिळून आले. आणखी दोन महिला स्टाफ रूममध्ये आढळून आल्या.

चौकशीत संबंधित महिलानी स्पा सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून देहविक्री करून घेत असल्याची माहिती पोलिसांना दिली.या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपींकडून महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्रीस भाग पाडले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणी संतोष गणेश बघे, अनिकेत अशोक बचाटे, काळुराम भिमा समिंदर आणि ग्राहक सजन एस. यांच्याविरोधात विविध कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाईदरम्यान तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, पोउपनिरीक्षक तुषार धाकराव, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच पंच उपस्थित होते

Previous Post

मंडप टाकणार नाही…रणरणत्या उन्हात उपोषण करणार.. मेलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार .

Next Post

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

Next Post

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या ताटातील विष थांबवतील का?

May 28, 2026

नगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी काय केलं चार जणांविरोधात गुन्हा

May 28, 2026

मंडप टाकणार नाही…रणरणत्या उन्हात उपोषण करणार.. मेलो तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार .

May 28, 2026

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल मिळू शकत स्वस्त..खा.लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितला मार्ग

May 28, 2026

अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 27, 2026

प्रशासकीय बेजबाबदारपणाचा कळस! ठेकेदाराच्या मनमानीमुळे वाघ नगरवासीय ३ दिवसांपासून पाण्याविना तहानलेले

May 27, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..