Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
May 9, 2026
in राजकीय
0

अहिल्यानगर | प्रशांत बाफना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात गाठत अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या. तू गुरुवर्यांना बोलायचे नव्हते, ते आमचे सर्वस्व आहे, परत नादी लागू नको, असे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली आहे. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता संग्राम भंडारे यांनी केलेल्या कृत्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

आ. जगताप म्हणाले की, मी हभप संग्राम बापू भंडारे यांचे अभिनंदन करतो आणि समर्थ देखील करतो. त्यांनी जे केले त्यामागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राची आणि देशाची एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता समर्पित केले आहे. त्यामुळे बापूंनी जे केलेले आहे, त्याचे आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत योग्य भूमिका बजावली. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगत हे देखील लोकांसमोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी ‘एस’वर एक व्हिडीओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. वारकर्‍यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही १०/१५ गुंड व्हीलरमध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची (ता. हवेली) येथे प्रवचन संपल्यानंतर १० वाजता मी परतत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाई ओतली. मला धक्काबुक्की करत पिस्तूल दाखवला आहे. नंतर ते पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब माझ्यावर हल्ला करणार्‍या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा. तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे, असे लवांडे यांनी म्हटले आहे

Previous Post

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

May 9, 2026

साखरपुड्याच्या सोहळ्यात चोरट्यानी मारला लाखो रुपयांच्या सोन्यावर डल्ला

May 9, 2026

अवैध धंदे करणाऱ्यांच्या मागे लागणार आता या ‘डॅशिंग पोलीस ऑफिसर’ची ‘साडेसाती’ …! एसपी मुम्मका सुदर्शन पहिल्या काही दिवसांतच ‘ॲक्शन मोड’वर…! इच्छाशक्ती आणि ‘इन्फॉर्मेशन सोर्स’च्या पाठबळावर १ कोटी ४६ लाखांची सुपारी केली जप्त…

May 9, 2026

जळगाव PWD हादरले! ५ लाखांची लाच स्वीकारताना कनिष्ठ अभियंता योगेश अहिरे एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026

किरण कडू पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड

May 9, 2026

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथील आदिवासी भिल्ल बांधवांच्या विकासासाठी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे निवेदन

May 9, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..