
तालुका प्रतिनिधी:- राहुल जयकर
भुसावळ : पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार डी. के. आरिकर यांच्या आदेशाने तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुखदेव लक्ष्मण भालेराव (पत्रकार), उत्तर महाराष्ट्र सचिव, भूगोल अभ्यासक व संशोधक प्रा. योगेश दिनकर गोसावी आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे (अप्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शेखर धांडे यांच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण व विकासाशी संबंधित विविध उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि पत्रकार बांधवांकडून शेखर धांडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पाणी संवर्धन तसेच जनजागृतीसाठी व्यापक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.






