Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

खुनातील सराईत आरोपी व त्याचा साथीदार गजाआड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 18, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
-सालवडगाव येथील खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार असलेले मुख्य आरोपी रामा गाडे व त्याचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षित बालकाला शेवगाव पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत अटक करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

11 एप्रिल रोजी संदीप दिनकर लांडे (वय 32, रा. सालवडगाव, ता. शेवगाव) हे शेतात काम करत असताना त्यांच्या काही परिचितांनी त्यांना काम आहे, असे सांगून शेवगाव येथे आणले. त्यानंतर ढाकणे वस्ती, डायमंड शाळेच्या पाठीमागील परिसरात आरोपी व मयत यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. आरोपी गाडे व त्याच्या साथीदाराने लाकडी काठी, कमरेचा बेल्ट व दगडाच्या साहाय्याने संदीप लांडे यांच्यावर निर्दयी हल्ला करून त्यांचा खून केला. या घटनेनंतर मयताचे वडील दिनकर लांडे (रा. सालवडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तात्काळ तीन स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. 16 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आखेगाव रोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून शिताफीने दोघांनाही ताब्यात घेतले.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे,शाम गुंजाळ, भगवान सानप, एकनाथ गर्कळ, राहुल खेडकर, राहुल आठरे, प्रशांत आंधळे, वसंत वैद्य, ईश्वर बेरड, राजू बडे, सचिन पिरगळ यांनी सहभाग घेतला. तसेच होमगार्ड जमीर शेख, अमोल बोरुडे, नवनाथ मरकड, पांडुरंग दहिफळे, महेश नलवडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डु व अरुण सांगळे यांनी तांत्रिक सहाय्य करून तपासात मोलाची मदत केली

Previous Post

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

Next Post

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

Next Post

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त

April 22, 2026

शेखर अशोक धांडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

April 20, 2026

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

April 18, 2026

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

April 18, 2026

खुनातील सराईत आरोपी व त्याचा साथीदार गजाआड

April 18, 2026

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

April 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..