Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 3, 2026
in जळगाव
0

उपसंपादक :-मिलिंद जंजाळे
यावल तालुक्यातील
साकळी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने अक्षरशः थैमान घातले असून, दि. २ रोजी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चावडी परिसरातील दत्त मंदिराजवळील भलेमोठे उंबराचे झाड अचानक मुळासकट उन्मळून कोसळले, आणि या थरारक प्रसंगात मंदिरात दर्शन घेत असलेल्या सौ. रोहिणी योगेश नेवे (वय ४५) या थोडक्यात बचावल्या.
घटना सायंकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास घडली. त्या वेळी मंदिरात रोहिणी नेवे या एकट्याच भाविक उपस्थित होत्या. त्या देवासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेत असतानाच, मंदिराच्या अगदी बाजूला असलेले विशाल झाड अचानक कोसळले.
क्षणभरात थरार – मृत्यू समोर उभा, पण धैर्याने वाचली जीव!
झाड इतक्या जोरात कोसळले की, त्याचा मोठा भाग मंदिर परिसरात पसरला. मात्र सुदैवाने झाड थेट मंदिरावर न पडता बाजूला लावलेल्या स्टील ग्रीलवर अडकले. त्यामुळे मंदिराचे व भाविकांचे मोठे नुकसान टळले.
प्रत्यक्षदर्शी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, झाड कोसळताच परिसरात एकच आरडाओरड झाली. त्यांनी रोहिणी नेवे यांना तात्काळ सावध केले. परिस्थितीची गंभीरता ओळखून, रोहिणी नेवे यांनी अजिबात न घाबरता धाडसाने स्टील ग्रीलवर चढून स्वतःचा जीव वाचवला.
‘देव तारी त्याला कोण मारी’ – म्हण झाली खरी!
या संपूर्ण घटनेत रोहिणी नेवे यांना कोणतीही दुखापत झाली नाही, हीच सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली. त्यामुळे परिसरात “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीची अक्षरशः प्रचिती आल्याची चर्चा रंगली आहे.
रोहिणी नेवे या पशुवैद्यकीय कर्मचारी वाय. जी. नेवे यांच्या पत्नी असून, त्या दररोजप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या.
मोठा अनर्थ टळला*
सदर दत्त मंदिरात दररोज सायंकाळी पूजा-आरतीला मोठ्या संख्येने भाविक, विशेषतः महिला उपस्थित असतात.
जर ही घटना गर्दीच्या वेळी घडली असती, तर मोठा जीवितहानीचा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर संपूर्ण साकळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, धोकादायक झाडांची तातडीने छाटणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
वादळाचा इशारा अजून कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Previous Post

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

Next Post

साकळीत राजकीय भूकंपाची चाहूल!आजच्या प्रवेश सोहळ्यानंतर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?

Next Post

साकळीत राजकीय भूकंपाची चाहूल!आजच्या प्रवेश सोहळ्यानंतर शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

May 18, 2026

श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…

May 18, 2026

यावल तालुक्यातील हरिपुरा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाची महापंचायत सभा संपन्न

May 18, 2026

यावल पोलीसांचे दारूबंदी पथक सज्ज; साकळीतील अवैध गावठी दारू व्यवसायावर आता मोठी कारवाई होणार!

May 18, 2026

श्री .संदीप गोसावी सर यांची शिक्षक व शिक्षकेतरसंघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा चिटणीस पदी निवड

May 18, 2026

जामखेडमध्ये सहा लाखांचा गुटखा साठा जप्त खर्डा पोलिसांची मध्यरात्री कारवाई; टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत

May 17, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..