Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
April 3, 2026
in क्राईम
0

अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
एरंडगाव समसूद (ता. शेवगाव) येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून, पैशांच्या वादातून एका वडिलांनी आपल्या मुलीची कुऱ्हाडीने हत्या केली, तर दुसरी मुलगी जखमी झाली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिने तिची मोठी बहीण मिर्चाना हिच्यासह वडिलांच्या एरंडगाव येथील घरी भेट दिली होती. ऊसतोड कामासाठी दिलेल्या पैशांवरून कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. वाद चिघळत गेल्यानंतर जयराम भोसले यांनी संतापाच्या भरात कुऱ्हाड उचलून मिर्चाना हिच्या चेहऱ्यावर व मानेवर वार केले. यात ती गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडली.

दरम्यान, बहिणीला वाचवण्यासाठी धावलेल्या भारती हिलाही आरोपीने मारहाण केली. या हल्ल्यात ती किरकोळ जखमी झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपी जयराम शंकर भोसले (वय ६५, रा. एरंडगाव) याला अटक करण्यात आली.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात शांतता प्रस्थापित केली आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत

Previous Post

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

Next Post

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

Next Post

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दत्त मंदिराजवळ वादळाचा कहर – उंबराचे भलेमोठे झाड कोसळले; महिला थोडक्यात बचावली!

April 3, 2026

एरंडगाव येथे पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलीची कुऱ्हाडीने हत्या; दुसरी मुलगी जखमी

April 3, 2026

रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

April 3, 2026

भुसावळ–न्हावी रस्त्याच्या रुंदीकरणात परवानगीशिवाय वृक्षतोड; २० हजारांचा दंड वसूल ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; १३ एप्रिलला धरणे आंदोलनाचा इशारा

April 1, 2026

दहिगाव जलजीवन योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराविरोधात संताप उसळला

April 1, 2026

तुकाराम मुडे यांची पुन्हा बदली; 29 वर्षात 24 बदली

April 1, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..