Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 30, 2026
in ताज्या बातम्या
0

अहिल्यानगर, ( प्रशांत बाफना ):- भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि. ३० व ३१ मार्च, २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच दि. १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी  दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना, वीजा चमकणे किंवा वादळी वारे असताना झाडाखाली उभे राहू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये व विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांजवळ थांबू नये. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) परिसरात थांबणे टाळावे. वीजा चमकत असताना उघड्यावर असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा.

धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये; धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.

शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी.बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ अथवा २३५६९४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे

Previous Post

संजय बाचकर सरांचा वाढदिवस शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजराहॅलो बातमीदार

Next Post

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

Next Post

यावलमध्ये ACB ची धडक कारवाई : वनरक्षकावर लाच मागणीचा गुन्हा, वनविभागातील भ्रष्टाचार उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

May 19, 2026

मिम भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शेख यांची नियुक्ती

May 19, 2026

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

May 18, 2026

श्रीगोंदा शहरात मावा, गुटखा व नशीले पदार्थांची विक्री वाढली; लहान वयातील मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात…

May 18, 2026

यावल तालुक्यातील हरिपुरा येथे आदिवासी तडवी भिल्ल समाजाची महापंचायत सभा संपन्न

May 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..