Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

वनविभागाचा सापळा यशस्वी; 15 लाखांचा डिंक जप्त, अवैध गोडाऊन उघड

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 27, 2026
in क्राईम
0

रावेर तालुका (प्रतिनिधी ) – पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक 32 मध्ये दिनांक 25 मार्च 2026 रोजी अवैधरित्या डिंक संकलन व वाहतूक करणाऱ्या चौघांवर वनविभागाने धडक कारवाई करत त्यांना अटक केली. या कारवाईत 110 किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला.अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणदास गबू डुडवे (वय 38), अमित सुजाण मोरे (वय 21), सावन रणजित मोरे (वय 24) हे सर्व रा. मेंढागड, जि. खरगोन तसेच हेमराज होरपाल चव्हाण (वय 22, रा. मांडवखेडा, जि. खरगोन) यांचा समावेश आहे.
पुढील चौकशीत पाल येथील एका व्यापाऱ्याच्या अवैध गोडाऊनवर वनविभागाने धाड टाकली. या धाडीत धावडा, सलाई व कड प्रजातीचा एकूण 7500 किलो डिंक जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजित किंमत सुमारे 15 लाख रुपये आहे.कारवाईदरम्यान MP10ZA8140 क्रमांकाची शाईन कंपनीची गाडी तसेच MH19N-5308 क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली.या प्रकरणी आरोपींवर भारतीय वन अधिनियम 1927 तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भवर व सहा वनसंरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी, रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीना तडवी, धनाबाई भादले, सविता बारेला, दीपक बारेला, मुकेश तडवी, आकाश बारेला तसेच पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील व ईश्वर चव्हाण यांनी सहभाग घेतला.या कारवाईसाठी रावेर येथील पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous Post

साकळीतील ईद मिलाद सोहळा ठरला एकात्मतेचा संदेश देणारा!मेश ऍग्रो संचालकांकडून वडिलांचा सामाजिक वारसा जपला जातोय

Next Post

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

Next Post

मंत्री पंकजा मुंडे यांच मोठं वक्तव्य गडावरुन भावनिक साद म्हणाल्या ; राजकारण संपल्यावर मी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोगस कुणबी प्रमाणपत्रं रद्द होणार? मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग,

May 19, 2026

पाथर्डीत स्त्री बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीसात शिबिरांत 154 हून अधिक महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026

शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

May 19, 2026

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणाऱ्या भोंदूबाबाला १० वर्षे सक्तमजुरी

May 19, 2026

मिम भिम सामाजिक संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्षा पदी परविन शेख यांची नियुक्ती

May 19, 2026

वऱ्हाड निघालं बैलगाडीत ग्रामीण संस्कृती, नाती आणि सामाजिक मूल्यांचा जिवंत दस्तऐवज

May 18, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..