Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 4, 2026
in सामाजिक
0

तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर

चोपडा तालुक्यातील वड्री येथे आयोजित आदिवासी विकास परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात तडवी भिल्ल समाज बांधवांकडून मंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.

परिषदेदरम्यान आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांवर चर्चा करण्यात आली. शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, वनहक्क आणि सामाजिक सक्षमीकरण या विषयांवर मार्गदर्शन करताना मंत्री उईके यांनी शासन आदिवासी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. समाजातील तरुणांनी शिक्षण व स्वावलंबनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास आदिवासी एकता मंचचे जिल्हाध्यक्ष मेहेरबान तडवी, जिल्हा उपाध्यक्ष फरीद तडवी, महिला जिल्हाध्यक्ष मुन्नाताई तडवी, जिल्हा सचिव फक्त तडवी, जिल्हा सहसचिव जुम्मा तडवी, महिला उपाध्यक्ष रेहाना तडवी, जिल्हा सदस्य समीना तडवी, जिल्हा संघटक रब्बील तडवी, यावल तालुका अध्यक्ष युसुफ तडवी, चोपडा तालुका अध्यक्ष वसीम तडवी, यावल तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी, सदस्य फिरोज तडवी (भालोद), तालुका सदस्य सुपडू तडवी (सांगवी), मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष रशीद तडवी, एकता मंच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दस्तगीर तडवी तसेच राज्य सदस्य मनेश तडवी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेमुळे आदिवासी समाजात एकजूट व संघटनात्मक बळकटी वाढीस लागणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Next Post

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

Next Post

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजूनही सुरुच आहे माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिलेंचा जनता दरबार…! तीच ‘स्टाईल’, तोच जनसंपर्क, प्रश्न मार्गी लावण्याची तीच पद्धत…! युवा नेते अक्षय कर्डिले चालविताहेत वडिलांचा आदर्श…!

March 4, 2026

साकळीकरांच्या ऐतिहासिक लढ्याचा दणदणीत विजय!साकळी फाट्यापासून गावापर्यंत रस्त्याचे थेट काँक्रीटीकरण; दोन्ही बाजूंनी पक्क्या गटारींचे काम वेगात

March 4, 2026

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

March 4, 2026

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

March 4, 2026

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

March 4, 2026

‘आमचे जंगल, आमचा अधिकार!’ यावल वन्यजीव अभयारण्यच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा कडाडून विरोध

March 4, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..