Hello Batmidar
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Hello Batmidar
No Result
View All Result

दिलासादायक: परदेशात अडकलेल्या नागरिकांशी प्रशासनाकडून संपर्क; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महत्वाची माहितीजिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

Editor Hello Batmidar by Editor Hello Batmidar
March 4, 2026
in शासकीय
0

अहिल्यानगर / प्रशांत बाफना
मध्यपूर्व व आखाती प्रदेशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरीकांशी संपर्क साधण्यात आला असून, भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय व महाराष्ट्र शासनाने परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली आहेत. या भागात अडकलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

परदेशात अडकलेल्या नागरीकांच्या नातेबाईकांनी नियंत्रण कक्षात संपर्क साधावा उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकार्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

​परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेवर महाराष्ट्र शासन व परराष्ट्र मंत्रालय यांचे बारकाईने लक्ष असून, त्यांच्या संरक्षणासाठी व आवश्यकतेनुसार त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.राज्य सरकारने केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनूसार चोवीस तास हेल्पलाईन नंबर देण्यात आले असून संपर्कासाठी ०२२-२२०२७९९० असा क्रमांक देण्यात आला आहे.
अहील्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील ०२४१-२३२३८४४. व २३५६९४० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन नंबर मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

​ अहिल्यानगर जिल्ह्यातील जे नागरिक या युद्धजन्य परिस्थितीत अडकले आहेत त्यांना विमानसेवा बंद असल्याने थांबण्याची वेळ आली आहे.या सर्वाशी जिल्हाधिकारी कार्यालयाने संपर्क केला असून काही नागरीकांशी व्यक्तिगत आपणही संपर्क करून दिलासा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.माहिती देण्यासाठी व मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

​​विविध देशांतील भारतीय दूतावासांचे २४x ७ आपत्कालीन क्रमांक उपलब्ध
तात्काळ मदतीसाठी इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी), कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि इराक (बगदाद) येथील भारतीय दूतावासांनी विशेष आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक, व्हॉट्सॲप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर केले आहेत. नागरिकांनी गरजेनुसार या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

Previous Post

दोन अज्ञातांचा धुमाकूळ; यावलमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या जीवाला धोका

Next Post

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

Next Post

वड्री येथे आदिवासी विकास परिषदेचा उत्साहात समारोप; मंत्री अशोक उईके यांचा तडवी भिल्ल समाजाकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनोलीत अतिक्रमणांचा धुमाकूळ; प्रशासन गप्प! सरपंच-ग्रामसेवकांवर राजकीय दबावाचा गंभीर आरोप

April 18, 2026

शेकडो वर्षांची परंपरा जपणारा साकळीचा भव्य यात्रोत्सव आजपासून सुरू!

April 18, 2026

खुनातील सराईत आरोपी व त्याचा साथीदार गजाआड

April 18, 2026

धक्कादायक वास्तव! जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किनगाव PHC मध्ये रुग्णांचा जीव धोक्यात

April 18, 2026

किंनगावात “महाराजस्व समाधान शिबीर”ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो लाभांचे वितरण

April 17, 2026

राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांची पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी निवड

April 17, 2026
Hello Batmidar

© 2025 Powered by ContentOcean Infotech..

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2025 Powered by ContentOcean Infotech..